मनुस्मृतीचे दहन करून स्त्री मुक्ती दिन साजरा

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : अमानवीय कायद्याचे समर्थन करणारी, स्त्रीयांचे हक्क नाकारणाऱ्या व्यवस्थेचे समर्थन करणारी, वर्णवादी व्यवस्थेचे समर्थन करणारी मनुस्मृती याच मनुस्मृतीचे दहन 25 डिसेंबर 1927 रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.मनुस्मृती दहन दिनाचे औचित्य साधून भिमनगर मित्र मंडळ यांच्या वतीने पुतळा पार्क परिसरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा भारतीय संविधान देऊन सत्कार करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने संस्कृत विषयाच्या शिक्षिका सौ उर्मिला जावळे मॅडम, दंतरोग तज्ञ सौ सोनाली भालेराव मॅडम, पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या ऍड उषा पवार मॅडम, सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असणाऱ्या सौ मीना व्हनकट्टे मॅडम, गृहिणी तथा यशस्वी विमा प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या कीर्ती कांबळे, तसेच बौद्ध धम्म कार्यात अविरत कार्य करणाऱ्या सौ राजश्री कदम यांचा सन्मान केला.मनुस्मृतीने स्त्रियांचे हक्कचं काय माणुसपणही हिरावले उपभोग्य वस्तू, चूल आणि मुलं इथपर्यंतच सीमित ठेवण्याची मानसिकता, तसेच आजही स्वतःला सुशिक्षित समजणारे पण महिलांच्या मासिक पाळीच्या काळात तिच्या हातून होणारे कुठलेही कार्य हिन समजणारी मानसिकता आजही आहे यावर जनजागृतीची गरज असल्याचे, तसेच नोकरी, व्यवसाय, व कुटुंबात आजही स्त्रीला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. क्रांतिबा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या संघर्षामुळे व भारतीय संविधानातील हक्क अधिकारामुळे स्त्रियांना स्वातंत्र्य मिळाले आहे. याचा महिलांनी विचार करून व शिक्षण घेऊन पुढे यावे असे विचार सत्काराला उत्तर देताना सर्व महिलांनी मांडले. यावेळी दिपाताई गायकवाड, नीता कांबळे, रेखाताई सरवदे, सीमाताई भालेराव, निर्भीड पत्रकार संघाच्या जाधवर , माजी शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे , संभाजी ब्रिगेडचे आनंद काशीद यांच्या शुभहस्ते महिलांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऍड अविनाश गायकवाड, तानाजी बोकेफोडे,मक्रोज बोकेफोडे, रमेश गवळी सर, प्रा डॉ शशिकांत गायकवाड, ऍड प्रसन्नजित नाईकनवरे, ऍड विवेक गजशीव, कुमार कांबळे, अतुल पेटाडे, आनंद कांबळे, अय्याज पठाण अक्षय शिंदे यांनी प्रयत्न केले सूत्रसंचालन अजित कांबळे यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या