निवडणूकपुणेबार्शीमहाराष्ट्र

पुणे पदवीधर मतदारसंघातून भाऊसाहेब आंधळकरांचा उमेदवारी अर्ज दाखल

B1न्यूज मराठी नेटवर्क500

पुणे : बार्शीतील शिवसेना (शिंदे गट) नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी मंगळवारी (दि. ६ ऑक्टोबर) पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. पुणे येथील मुख्य निवडणूक अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला.

यावेळी भानुप्रताप बर्गे, जी. सरपंच दराडे, अॅड. काशीद, दीपक आंधळकर, संजय तेलंग, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रवींद्र रसाळ यांच्यासह विविध क्षेत्रांतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे व मुंबई येथील विविध संघटनांचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.500सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनांमधील पोलीस निरीक्षक, फौजदार, हेडकॉन्स्टेबल व कॉन्स्टेबल तसेच विविध १४ संघटनांशी संबंधित पदाधिकाऱ्यांची उपस्थिती यावेळी दिसून आली.

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर असून, ७ ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी आणि ९ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. २३ ऑक्टोबर रोजी मतदान, तर २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button