पंढरपूरमहाराष्ट्रसोलापूर

दुष्काळी परिस्थितीत कीर्तन-प्रवचनातून शेतकऱ्यांना आधार द्या; आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यापासून परावृत्त करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महाराज मंडळींना आवाहन

विठ्ठलाच्या महापूजेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संतपूजा

B1न्यूज मराठी नेटवर्क350

पंढरपूर : (21)कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरातील वारकरी संप्रदायातील विविध महाराज मंडळींची संतपूजा केली. पंढरपुरातील धुंडा महाराज देगलूरकर मठ येथे हा संतपूजेचा कार्यक्रम पार पडला.यावेळी विविध महाराज मंडळींचा सन्मान करून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. तसेच मासिक आनंदवारी या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.350
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी संकटात आहे. अशा कठीण काळात कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्याचे काम संत-महंत आणि महाराज मंडळींनी करावे. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, यासाठी समाजप्रबोधनातून त्यांच्यामध्ये सकारात्मक विचार निर्माण करण्याची गरज आहे.
वारकरी संप्रदायाला समाजप्रबोधनाची मोठी परंपरा लाभली आहे. कीर्तन आणि प्रवचनातून शेतकऱ्यांना संकटाचा सामना करण्याचे बळ मिळू शकते. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, बळीराजा या संकटातून लवकर बाहेर पडेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. शेतकरी बांधवांना धीर देण्याचे आणि त्यांच्यामध्ये जगण्याची उमेद निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य वारकरी संप्रदायाने करावे, अशी विनंतीही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी महाराज मंडळींना केली.
350

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button