बार्शीमहाराष्ट्रशिबीर

२६/११ च्या शहीदांना अनोखी श्रद्धांजली! बार्शीत पोलिसांकडून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ २६ नोव्हेंबर रोजी रक्तदानाचा सामाजिक उपक्रम

B1न्यूज मराठी नेटवर्क350

बार्शी : मुंबई येथे २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांना अभिवादन व श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बार्शी पोलीस उपविभागाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

बार्शी शहर पोलीस ठाणे व बार्शी तालुका पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. बार्शी तालुका पोलीस ठाणे, तांगे उपळाई रोड, बार्शी येथे हे शिबिर पार पडणार आहे.350मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याबरोबरच रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. शहीद जवानांच्या त्यागाचे स्मरण करत समाजातील गरजू रुग्णांना रक्ताची मदत मिळावी, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाची संकल्पना पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी (सोलापूर) यांची असून, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे (सोलापूर) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी सुहास जगताप यांच्या शुभहस्ते शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी पोलीस निरीक्षक गणेश कुंभार (बार्शी शहर) आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी नियोजन करीत आहेत.350

रक्तदान हेच शहीदांना खरे अभिवादन!

या रक्तदान शिबिरात बार्शी शहर व तालुक्यातील नागरिक, युवक, सामाजिक संस्था, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि रक्तदाते यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन बार्शी शहर पोलीस ठाणे व बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.

आयोजक : बार्शी शहर पोलीस ठाणे व बार्शी तालुका पोलीस ठाणे, बार्शी.350

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button