उद्घाटननांदेडमहाराष्ट्र

कंधारच्या विकासाला नवी गती ; तीन महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते लोकार्पण

शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि विकसित उद्यान नागरिकांच्या सेवेत दाखल

B1न्यूज मराठी नेटवर्क350

नांदेड, दि. २० : कंधार शहराच्या विकासात महत्त्वपूर्ण भर घालणाऱ्या शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय , उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि शांतीदूत गोविंदराव पाटील चिखलीकर विकसित उद्यानाचे लोकार्पण आज राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

या तीन महत्त्वपूर्ण प्रकल्पांमुळे कंधार परिसरातील नागरिकांना आरोग्य, प्रशासकीय सेवा आणि मनोरंजनाच्या अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामुळे परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यास मदत होणार असून, उपविभागीय अधिकारी कार्यालयामुळे प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ होणार आहे. तसेच विकसित उद्यानामुळे नागरिकांना विरंगुळ्यासाठी एक चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे.350कार्यक्रमास राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता रुपा राऊळ, उपविभागीय अधिकारी विलास नरवटे यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.350

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button