प्रशासनमहाराष्ट्रसोलापूर

जिल्ह्यात 20 व 21 नोव्हेंबर रोजी कार्तिकी यात्रे निमित्त मद्य विक्री बंद चे आदेश

B1न्यूज मराठी नेटवर्क350

सोलापुर दि. 20 : श्री. क्षेत्र पंढरपूर जि. सोलापुर येथे संपन्न होणा-या कार्तिकवारी यात्रेनिमित्त सोलापूर जिल्हयात व पंढरपूर शहरात सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र मद्यनिषेध कायदा 1949 चा कलम 142 (1) नुसार जिल्हाधिकारी एस कार्तीकेयन यांनी सर्व देशी, सर्व विदेशी किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्या व ताडी विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवणेसंदर्भात खालील प्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत.

कार्तिक यात्रा उत्सव 2026 निमित्त पंढरपूर शहरात सार्वजनिक शांतता महाराष्ट्र दारुबंदी कायद्यातील कलम 142 अन्वये दिनांक 20 व 21 नोव्हेंबर 2026 रोजी पंढरपूर शहरातील सर्व देशी व विदेशी किरकोळ मद्य विक्री, ताडी विक्री अनुज्ञप्त्या पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात येत आहेत.350महाराष्ट्र विदेशी दारु (रोखीने विक्री, विक्री रजिस्टर इ.) नियम 1969 चे नियम 9 (अ) (2) (ब) (आठ) नुसार कार्तिकवारी यात्रा म्हणजेच दिनांक 21 नोव्हेंबर 2026 रोजी सोलापूर जिल्हयातील सर्व एफएल-2. एफएल-3, एफएल-4, एफएलडब्ल्यू-2. नमुना ई-2, एफएलबीआर-2, सीएल-3, ताडी विक्री अनुज्ञप्त्या बंद राहतील.

तरी जिल्हयातील सर्व देशी, विदेशी मद्य विक्री अनुज्ञप्तीधारक व ताडी विक्री अनुज्ञप्तीधारकांनी आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे आदेश जिल्हाधिकारी एस कार्तीकेयन यांनी दिले आहेत.350

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button