छत्रपती संभाजीनगरमहाराष्ट्रसामाजिक

सिल्लोड येथे सामाजिक उपक्रम अविरत शिक्षणासाठी दुष्काळी परिस्थितीत गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप

B1न्यूज मराठी नेटवर्क350

छत्रपती संभाजीनगर, दि.२२ : दुष्काळी परिस्थितीत मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये. त्याचे शिक्षण अविरत सुरु रहावे यासाठी सिल्लोड येथे एक हजार गरजू विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते आज करण्यात आले. तसेच तालुक्यातील ५६७ निराधार व्यक्तिंना लाभ मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले. आमदार अब्दुल सत्तार यांनी हा उपक्रम राबविला.

दुष्काळी परिस्थितीत दुष्काळी भागातील जनतेच्या हितासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. सिल्लोड येथे आ. अब्दुल सत्तार यांनी १००० गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप हा उपक्रम राबविला. तसेच निराधारांसाठी असलेल्या विविध योजनांच्या लाभ मंजूरीचे पत्र ५६७ लाभार्थ्यांना देण्यात आले. सिल्लोड येथे आज विधान परिषद उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते हा उपक्रम पार पडला. नगराध्यक्ष अब्दुल समीर, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी या कार्यक्रमास उपस्थित होते.350उपसभापती सचिन अहिर म्हणाले की, दुष्काळाच्या या कठीण परिस्थितीत सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण साऱ्यांनी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी खचून न जाता धीर धरावा, राज्य शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून संकटाच्या काळात त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल.

आमदार अब्दुल सत्तार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. विकासकामांसोबतच सर्वसामान्य नागरिकांना संकटाच्या काळात दिलासा देण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यास आपण बांधील असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. याप्रसंगी विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.350

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button