राष्ट्रीय लोकअदालतीत सांगली जिल्ह्यात 3161 प्रकरणे निकाली, 19 कोटी 92 लाख 96 हजार 774 रुपयांची वसुली
B1न्यूज मराठी नेटवर्क
सांगली : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष अदिती उदय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोकअदालत घेण्यात आली. या लोकअदालतीमध्ये 3161 प्रकरणे निकाली काढण्यात आली. या लोकअदालतमध्ये एकूण 19 कोटी 92 लाख 96 हजार 774 रुपये रक्कमेची वसूली करण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
लोकअदालतीच्या दिवशी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती उदय कदम यांनी उपस्थित पक्षकारांना जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटवून घेऊन आपला वेळ व पैसा वाचविण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा न्यायाधीश क्र. 1 व्ही. डी. निंबाळकर, जिल्हा न्यायाधीश -7 श्रीमती एम. एस. काकडे, कौटुंबिक न्यायालय जज श्रीमती एस. जे. घरत, जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रमोद भोकरे, वकील संघटनेचे उपाध्यक्ष महाजन, पक्षकार व विधिज्ञ उपस्थित होते.
लोक अदालतमध्ये सांगली जिल्ह्यातील 2084 दावापूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. तसेच सर्व न्यायालयांतील 1077 प्रलंबित प्रकरणे अशी एकूण 3161 प्रकरणे निकाली काढण्यात आली. या लोकअदालतमध्ये एकूण 19 कोटी 92 लाख 96 हजार 774 रुपये रक्कमेची वसूली करण्यात आली.
लोक अदालतमध्ये सांगली मुख्यालय येथे पॅनेलप्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश ६ एस. बी. देसाई व तदर्थ जिल्हा न्यायाधीश क्र. 1 एम. एम. शेख, २रे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ए. ए. वाळूजकर, ३रे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पी. ए. जगदाळे, ५वे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस. बी. माने, ४थे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती. पी. एन. गोसावी, ५ वे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती. व्ही. ए. आद्य, कौटुंबिक न्यायाधीश श्रीमती. एस. जे. घरात, निवृत्त न्यायाधीश एस. ए. उपाध्ये, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती. एम. डी. खासनीस, २रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती. आर. एस. पाटील यांनी काम पाहिले.
तसेच कन्सिलिएटर म्हणून अॅड. जे. व्ही. नवले, अॅड अनुराधा कुलकर्णी, अॅड. स्वप्ना अरविंद देशपांडे, अॅड. सनी सलीम जमादार, अॅड. उदय सॅमसन आवळे, अॅड राजगुरू भूपाळ संकपाळ, अॅड. प्रविण पांडुरंग गोंधळे, डॉ. पूजा नरवाडकर, अॅड. सिध्दार्थ जयकर काकडे यांनी पॅनेल अॅडव्होकेट काम पाहिले.
लोकअदालत यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी संपूर्ण नियोजन केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक शंकरराव वानखेडे तसेच संतोष खंदारे, नितीन आंबेकर आणि विजय माळी उपस्थित होते.
लोकअदालतीमध्ये पक्षकारांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. पुढील राष्ट्रीय लोकअदालत १२ डिसेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार असून, पक्षकारांनी यामध्ये सहभागी होऊन आपली प्रकरणे तडजोडीने मिटवून घ्यावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगलीतर्फे करण्यात आले आहे.




