जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

सोलापूर, दि. 7 : जिल्हाधिकारी कार्यालयात आज अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा लोकशाही दिनात नागरिकांच्या विविध तक्रारींसंबंधी एकूण 47 अर्ज प्राप्त झाले.

प्राप्त माहितीनुसार, तहसीलदार मोहोळ आणि जिल्हा उपनिबंधक या दोन विभागांकडे सर्वाधिक प्रत्येकी 5 अर्ज दाखल झाले आहेत. तर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख आणि तहसीलदार दक्षिण सोलापूर यांच्याकडे प्रत्येकी 3 अर्ज आले आहेत.

जिल्हा परिषद सोलापूर, तहसीलदार उत्तर, महावितरण, भूसंपादन समन्वय शाखा, सोलापूर महानगरपालिका आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय या 6 विभागांकडे प्रत्येकी 2 अर्ज प्राप्त झाले आहेत.500
तर उर्वरित 17 विभागांकडे प्रत्येकी 1 अर्ज प्राप्त झाला असून त्यामध्ये सह आयुक्त नगरपालिका, तहसीलदार मंगळवेढा, तहसीलदार सांगोला, तहसीलदार बार्शी, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, जि.प. माध्यमिक विभाग, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, जिल्हा कृषि अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा जलसंधारण, उपविभागीय अधिकारी सोलापूर विभाग क्र. 2, महसूल शाखा, अपर जिल्हा अधिकारी कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क, उपविभागीय अधिकारी सोलापूर विभाग क्र. 1, जेलरोड कारागृह आणि सहाय्यक कामगार आयुक्त या विभागांचा समावेश आहे. तसेच इतर 2 अर्ज प्राप्त झाले आहेत.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाचे उप मुख्य वित्त लेखा अधिकारी शशी किरण उबाळे, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक प्रकाश नांगरे, सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक गजानन वडेकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या