सुयश विद्यालय बार्शीमध्ये शिक्षकांना सन्मानित करत शिक्षक दिन उत्साहात साजरा

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : सुयश विद्यालय, बार्शी येथे भारताचे माजी राष्ट्रपती, महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहपूर्ण आणि विविधांगी कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयीचा आदर, कृतज्ञता आणि प्रेम आपल्या कलागुणांच्या माध्यमातून व्यक्त केले.

शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यालयात इयत्ता चौथी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी विशेष बालसभा सादर केली. या बालसभेमध्ये विद्यार्थ्यांनी विविध महापुरुषांची वेशभूषा करून त्यांच्या जीवनकार्याची आणि विचारांची माहिती प्रभावीपणे सादर केली. महापुरुषांच्या भूमिका साकारताना विद्यार्थ्यांनी केलेला अभिनय उपस्थितांची विशेष दाद मिळवून गेला.

कार्यक्रमामध्ये विविध बालनाट्ये, नृत्याविष्कार तसेच प्रभावी भाषणे सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झाले. बालनाट्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेश देतानाच शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. नृत्य आणि भाषणांच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या.500यावेळी सुयश संकुलाचे सर्वेसर्वा माननीय नलवडे , संस्थेच्या मार्गदर्शिका मा.सौ.प्रतिभा नलवडे मॅडम आणि सचिव या.सौ. प्रियांका नलवडे मॅडम यांच्या हस्ते सुयश संकुलातील सर्व शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त विशेष सन्मान करण्यात आला. शिक्षकांच्या ज्ञानदानाच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

तसेच प्राईम कम्प्युटर, बार्शीच्या अनुराधा कोले यांच्या वतीनेही सुयश संकुलातील सर्व शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. या सन्मानामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षकवृंदाने विशेष परिश्रम घेतले. तसेच माननीय मुख्याध्यापिका श्रीमती अलका जगताप मॅडम आणि उपमुख्याध्यापक संदीप येवले सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत शिक्षकांविषयी आदर आणि कृतज्ञतेची भावना रुजविणारा हा शिक्षक दिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि आनंददायी वातावरणात पार पडला.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या