शिक्षक दिनानिमित्त प्रा. डॉ. राहुल पालके यांचे प्रेरणादायी व्याख्यान संपन्न
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून आदर्श टेक्निकल अँड पॅरामेडिकल कॉलेज, बार्शी येथे शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथील प्रा. डॉ. राहुल पालके यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री. सागर करंडे होते. यावेळी प्रा. डॉ. राहुल पालके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षकांचा आदर, सातत्यपूर्ण अभ्यास, आत्मविश्वास, सकारात्मक विचार, ध्येय निश्चिती आणि कठोर परिश्रम यांचे महत्त्व स्पष्ट केले. शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास साधून विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करावे आणि यशस्वी होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी वैभव कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास झालटे मॅडम व देशमुख मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रगती अंधारे व सायली माने यांनी केले.
डॉ. पालके यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक व वैयक्तिक प्रगतीसाठी नवी दिशा मिळाली. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.





