बार्शी तहसील कार्यालयाचा स्तुत्य उपक्रम; विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी विशेष शिबिराचे आयोजन

0

B1 न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : बार्शी तहसील कार्यालयाच्या सर्व विभागांच्या संयुक्त विद्यमाने विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील लाभार्थ्यांना विविध शासकीय प्रमाणपत्रे, दाखले तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिबिरात जातीचे दाखले, उत्पन्न व निवासी दाखले, विविध शासकीय योजनांची माहिती, लाभ मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची मार्गदर्शक माहिती तसेच नागरिकांच्या अडचणींचे निराकरण करण्यात आले. बार्शी तालुक्यातील प्रमुख गावांमध्येही अशाच प्रकारची शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.500शिबिराचे उद्घाटन नायब तहसीलदार रविंद्र सानप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळ अधिकारी प्रताप कोरके, मंडळ अधिकारी शरद शिंदे, पुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर कुंतलवार, भटक्या जमातीचे राज्य उपाध्यक्ष नागनाथ अडसूळ, नाथपंथी डवरी गोसावी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण, फकीर अंधारे, कृष्णा उपाळकर, बालाजी अंधारे, मारुती वाघमोडे, जगन्नाथ जाधव, इमाम सापवाले, शंकर चौगुले यांच्यासह विमुक्त जाती व भटक्या जमातीचे पदाधिकारी, तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजातील पात्र लाभार्थ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी या विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रम बार्शी तहसील कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या