विद्यार्थिनींनी संकटाच्या प्रसंगी घाबरू नये; निर्भया पथक सदैव पाठीशी – बाबासाहेब घाडगे

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : श्री विश्व माऊली बहुउद्देशीय आध्यात्मिक वारकरी मुलींची शिक्षण संस्था, बार्शी येथे निर्भया पथक, बार्शी उपविभागाच्या वतीने विद्यार्थिनींसाठी जनजागृती व मार्गदर्शन मेळावा उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. कुमारी शिवलीला ताई पाटील होत्या. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा वर्षा बाळासाहेब पाटील, सचिव प्रदीपकुमार आगळे सर, पत्रकार राजश्री गवळी मॅडम, निर्भया पथकाचे प्रमुख पोहेकॉ. बाबासाहेब घाडगे तसेच पोकॉ. भाऊसाहेब महानोर उपस्थित होते.
यावेळी शिवलीला ताई पाटील यांनी विद्यार्थिनींना अध्यात्म, वारकरी संप्रदाय आणि स्त्री जीवनातील अध्यात्माचे महत्त्व समजावून सांगितले. अध्यात्मामुळे आत्मविश्वास, संस्कार, संयम व सकारात्मक विचारसरणी विकसित होते, असे त्यांनी सांगितले.
500निर्भया पथकाचे प्रमुख पोहेकॉ. बाबासाहेब घाडगे यांनी निर्भया पथकाची स्थापना, उद्देश व कार्यपद्धती याबाबत माहिती देत विद्यार्थिनींना स्वसंरक्षण, गुड टच-बॅड टच, महिला सुरक्षा, डायल ११२, विविध हेल्पलाइन क्रमांक, महिला व बालकांच्या संरक्षणासाठी असलेले कायदे, पोक्सो कायदा तसेच तक्रार कुठे व कशी दाखल करावी याबाबत मार्गदर्शन केले.

“संकटाच्या प्रसंगी घाबरून न जाता धैर्याने परिस्थितीचा सामना करा आणि तात्काळ मदत मागा. तुमच्या सुरक्षिततेसाठी निर्भया पथक सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,” असा विश्वास घाडगे यांनी विद्यार्थिनींना दिला.

विद्यार्थिनींनी शिक्षणाला प्राधान्य देत आई-वडील व गुरुजनांचा आदर करून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीपकुमार आगळे सर यांनी केले, तर आभार संस्थेच्या उपाध्यक्षा वर्षा बाळासाहेब पाटील यांनी मानले. कार्यक्रमास संस्थेतील विद्यार्थिनी, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या