ढोराळे सोसायटीचे चेअरमन गोपीनाथ जाधव यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश ;आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वावर विश्वास
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्यातील ढोराळे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन गोपीनाथ नारायण जाधव यांनी आमदार राजेंद्र राऊत यांच्या विकासात्मक नेतृत्वावर व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रणवीर राजेंद्र राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी तालुक्यात केलेली विकासकामे, शेतकऱ्यांसाठी आणलेले उजनीचे पाणी तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्याची त्यांची भूमिका पाहून आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे गोपीनाथ जाधव यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय गरड, सोसायटीचे सदस्य भारत रावसाहेब पाटील, शिवाजी पंढरी काकडे, गोपाळ देशमुख, तानाजी घाटे, राजेंद्र आबासाहेब देशमुख,उद्योजक समाधान देशमुख, संजय मारुती जाधव, राहुल खरात, सरपंच अमोल शिंदे यांसह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. गोपीनाथ जाधव यांच्या प्रवेशामुळे ढोराळे परिसरात भारतीय जनता पार्टीची ताकद आणखी वाढली आहे.





