क्रांतिसूर्य केसरी कुस्ती स्पर्धा २०२६ चे वैरागमध्ये उत्साहात उद्घाटन; आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते शुभारंभ

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

वैराग : श्री सच्चीदानंद संतनाथ महाराज यात्रेनिमित्त कै. माजी आमदार भाई चंद्रकांत (नाना) निंबाळकर कुस्ती मैदान, वैराग येथे आयोजित क्रांतिसूर्य केसरी कुस्ती स्पर्धा – २०२६ चे उद्घाटन सोलापूर जिल्हा विधान परिषदेचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.

महाराष्ट्राची परंपरा जपणाऱ्या मातीतील खेळ कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी संतनाथ महाराज यात्रेनिमित्त दरवर्षी या भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाही राज्यभरातील नामांकित मल्लांनी स्पर्धेत सहभाग नोंदविल्याने कुस्तीप्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, “कुस्ती ही आपल्या मातीची शान असून ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. कै. भाई नाना निंबाळकर यांनी कुस्ती क्षेत्रासाठी दिलेले योगदान मोलाचे आहे. त्यांच्या नावाने आयोजित होणारी ही स्पर्धा नव्या पिढीतील पैलवानांना प्रेरणा देणारी ठरत आहे. अशा स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील गुणवंत मल्लांना मोठे व्यासपीठ मिळते.”5000यावेळी माजी आमदार धनाजी साठे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, अरुण बारबोले, पंचायत समितीचे उपसभापती संतोष दादा निंबाळकर, बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय गरड, भाजप डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष डॉ. देवेंद्र डोके, तसेच मदन दराडे, अरुण कापसे, प्रमोद वाघमोडे, बाबासाहेब कापसे, रमेश पाटील, राहुल कापसे, अनिल कापसे, अनिल डिसले, दीपक रोंगे, अरुण सावंत, श्रीमंत थोरात, प्रशांत कथले, नेताजी घायटिडक, महेश पन्हाळे, बाबासाहेब गव्हाणे, विलास रेणके, वैजीनाथ आदमाने, जगन्नाथ आदमाने, भरतेश गांधी, प्रविण गायकवाड, बाबासाहेब रेड्डी, संदीप मिरगणे, नाना धायगुडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यात्रेनिमित्त आयोजित या कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी वैराग पंचक्रोशीतील हजारो कुस्ती शौकिनांनी मैदानावर मोठी गर्दी केली होती. पारंपरिक कुस्तीच्या फडाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने संपूर्ण परिसरात यात्रेचा आणि कुस्तीचा जल्लोषमय उत्साह अनुभवायला मिळाला.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या