बार्शी तालुक्याच्या कन्येची MPSC द्वारे राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक पदी निवड

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : बार्शी तालुक्यातील घोळवेवाडी येथील कु. ऋतुजा जयश्री दिलीप घोळवे हिने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) घेतलेल्या परीक्षेत ती उत्तीर्ण होऊन तिची State Excise Sub Inspector – राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.

आई-वडिलांनी दिलेले संस्कार, कष्टाची जाणीव आणि स्वतःची अथक मेहनत या त्रिसूत्रीच्या बळावर ऋतुजाने हे यश खेचून आणले आहे. ग्रामीण भागातून येऊन, अनेक अडचणींवर मात करत तिने ध्येयावर आपले लक्ष केंद्रित ठेवले. सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तिने हे यशाचे शिखर गाठले आहे.500ऋतुजाच्या या यशामुळे घोळवेवाडी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलीने शासकीय सेवेत उच्च पद मिळवणे, ही संपूर्ण बार्शी तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. प्रतिकूल परिस्थितीतही प्रयत्न सोडले नाहीत तर यश नक्कीच मिळते, याचे उत्तम उदाहरण ऋतुजाने घालून दिले आहे.

तिच्या या निवडीबद्दल घोळवे परिवार, नातेवाईक, मित्रमंडळी आणि ग्रामस्थांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सेवेत रुजू होत असताना तिने आपल्या कर्तृत्वाची नवी ओळख निर्माण केली असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ऋतुजाचे हे यश तालुक्यातील इतर युवक-युवतींसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या