विधानपरिषद निवडीबद्दल आमदार राजाभाऊ राऊत यांचा भव्य सत्कार; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते गौरव
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर, दि. ३ ऑगस्ट : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सेवक सहकारी पतसंस्था मर्या., सोलापूर यांच्या वतीने आयोजित सर्वसाधारण सभेमध्ये विधानपरिषद आमदारपदी निवड झाल्याबद्दल आमदार राजाभाऊ राऊत यांचा भव्य सत्कार करण्यात आला. हा सत्कार सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. जयकुमारजी गोरे यांच्या शुभहस्ते आणि जिल्ह्यातील विविध मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी बोलताना आमदार राजाभाऊ राऊत यांनी सांगितले की, “सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचारी बंधू-भगिनींनी केलेला हा भव्य सत्कार म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांची बँक असलेल्या जिल्हा बँकेसाठी केलेल्या कामाची मिळालेली पावती आहे. या सन्मानाबद्दल मी सर्व कर्मचारी बंधू-भगिनींचा ऋणी आहे.”
पुढे ते म्हणाले की, मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस, पालकमंत्री मा. ना. जयकुमार गोरे तसेच सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेसाठी भविष्यातही सातत्याने कार्य करत राहणार आहे. पतसंस्थेचे कार्य उल्लेखनीय आणि सातत्यपूर्ण असून भविष्यातही संस्था अशीच प्रगती करत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते मा. आ. राजन मालक पाटील, आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्रजी कोठे, मा. आ. रामभाऊ सातपुते, मा. आ. दीपक आबा साळुंखे, सोलापूरचे महापौर विनायक गोंड्याल, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपकजी वैद्य, भाजप सोलापूर जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, भाजप सोलापूर शहर अध्यक्षा रोहिणीताई तडवळकर, दिलीपभाऊ कोल्हे, गटनेते नरेंद्रजी काळे, बार्शी बाजार समितीचे सभापती विजय गरड, पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्रजी पवार, व्हाइस चेअरमन श्रीरंगजी सातपुते, बार्शी शाखाधिकारी राहुलजी खुणे यांच्यासह नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कर्मचारी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात आमदार राजाभाऊ राऊत यांच्या सहकार, बँकिंग आणि ग्रामीण विकास क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात आला. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.





