नशामुक्त युवा फॉर विकसित भारत जिल्हास्तरीय स्पर्धेत युवकांनी सहभागी व्हावे

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

धाराशिव दि. 27जुलै : माय भारत युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने ‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत’ या अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय विविध सांस्कृतिक, साहित्यिक व सर्जनशील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. व्यसनमुक्ती बाबत युवकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, यांच्या सृजनशीलतेला वाव देणे आणि विकसित भारताच्या उभारणीत युवकांचा सक्रिय सहभाग वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या स्पर्धेमध्ये लोकगीत( सामूहिक), सामूहिक नृत्य, पथनाट्य, चित्रकला, शॉर्ट फिल्म-रील, घोषवाक्य लेखन, स्लॅम पोएट्री (मौखिक कविता) तसेच भाषण स्पर्धेचा समावेश करण्यात आला आहे. सर्व स्पर्धा ‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत’ या विषयावर आधारित असून, व्यसनमुक्ती, निरोगी जीवनशैली, सामाजिक जबाबदारी आणि विकसित भारत निर्मितीत युवकांची भूमिका या विषयांवर स्पर्धकांनी आपले सादरीकरण करावे.500या स्पर्धांचे आयोजन दिनांक 30 जुलै 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), तुळजापूर येथे करण्यात आले आहे.

15 ते 29 वयोगटातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी, माय भारत, धाराशिव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा युवा अधिकारी, माय भारत, धाराशिव यांच्याशी 7498134147/9420200649 ह्या भ्रमणध्वनी क्रमांकावर अथवा mybharatdharashiv@gmail.com या ई-मेलद्वारे संपर्क साधावा.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या