राजेंद्र गुंड यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन योग्य सन्मान केला- व्हा.चेअरमन अशोक लुणावत
साई सेल्स् कार्पोरेशन व काशीद उद्योग समूहाच्या वतीने सत्कार
B1न्यूज मराठी नेटवर्क
माढा येथे जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल राजेंद्र गुंड यांचा सत्कार करताना माढेश्वरी बँकेचे व्हा.चेअरमन अशोक लुणावत,माजी संचालक गणेश काशीद व इतर मान्यवर.
माढा, मानेगाव : आज प्रत्येक क्षेत्रात भयंकर स्पर्धा व चढाओढ आहे.विशेषतः लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेच्या क्षेत्रात वस्तुनिष्ठ व निर्भिडपणे लेखणीच्या माध्यमातून सामाजिक,राजकीय, शैक्षणिक,कृषी व प्रशासकीय क्षेत्रातील समस्या व प्रश्न प्रभावीपणे मांडणे ही मोठी तारेवरची कसरत आहे.या सर्व बाबींवर खरे उतरल्यानेच राज्यातील नामांकित, वाचनीय व लिडींग दैनिक असलेल्या पुण्यनगरी समूहाच्या वतीने माढा तालुक्यातील मानेगावचे प्रतिनिधी राजेंद्र गुंड सर यांना जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन योग्य सन्मान केल्याचे प्रतिपादन माढेश्वरी अर्बन बँकेचे व्हा.चेअरमन अशोकशेठ लुणावत यांनी केले.
ते माढा येथे विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक तथा दैनिक पुण्यनगरीचे आदर्श पत्रकार राजेंद्र गुंड सर यांचा साई सेल्स् कार्पोरेशन व अंजनगाव उमाटे येथील काशीद उद्योग समूहाच्या वतीने रविवारी 26 जुलै रोजी सत्कार करताना बोलत होते.
यावेळी आदर्श शिक्षक तथा आदर्श पत्रकार राजेंद्र गुंड सर यांचा सत्कार करुन व्हा. चेअरमन अशोक लुणावत व माजी सरपंच गणेश काशीद सर यांनी पेढे भरवून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी माढेश्वरी बँकेचे माजी संचालक तथा अंजनगाव उमाटेचे माजी सरपंच गणेश काशीद सर यांनी सांगितले की, मानेगाव जिल्हा परिषद गटाच्या विविध गावांतील सर्व प्रकारच्या व स्तरातील बातम्यांना लेखणीतून न्याय देण्याची भूमिका पत्रकार राजेंद्र गुंड सर यांनी मागील 10 वर्षांपासून जपली आहे. सर्वसामान्य जनता, कष्टकरी शेतकरी, गुणवंत विद्यार्थी, शासकीय अधिकारी व नोकरदारांसह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे विधायक कार्य त्यांनी केले आहे.या बाबींची दखल घेऊन त्यांना दैनिक पुण्यनगरी समूहाने ग्रामीण भागातील जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित केले आहे.ही बाब मानेगाव गटासह माढा तालुक्यासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अंजनगाव उमाटेचे हभप हिरालाल पोतदार, दारफळ सीनाचे इंजिनिअर अभिजित लुणावत,सौदागर काशीद,पांडुरंग कन्हेरे, यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.





