बार्शी तालुका माजी सैनिक संघटनेतर्फे कारगील विजय दिवस उत्साहात साजरा; शहीदांना आमदार राजेंद्र राऊत यांची अभिवादनपूर्वक श्रद्धांजली

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी, दि. २६ : कारगील युद्धातील शूरवीरांच्या अद्वितीय शौर्याला अभिवादन करण्यासाठी बार्शी तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीने शहीद स्मारक येथे कारगील विजय दिवस मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी सोलापूर विधानपरिषदेचे आमदार राजेंद्र राऊत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी शहीद जवानांच्या स्मृतींना पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली तसेच दोन मिनिटे मौन पाळून वीर जवानांच्या बलिदानाला मानवंदना दिली.

यावेळी बोलताना आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, “कारगील विजय दिवस हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि कृतज्ञतेचा दिवस आहे. कारगीलच्या दुर्गम शिखरांवर देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूर जवानांच्या शौर्याला आणि त्यागाला कोटी कोटी प्रणाम. त्यांच्या बलिदानामुळेच आज आपण सुरक्षित आणि स्वाभिमानाने जगत आहोत. कारगील युद्ध हे भारतीय सैन्याच्या पराक्रम, शिस्त, राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य जिद्दीचे सर्वोच्च उदाहरण आहे.”

बार्शी तालुका माजी सैनिक संघटनेच्या कार्याचे कौतुक करताना त्यांनी सांगितले की, शहीदांच्या स्मृती जपणे, त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान राखणे आणि नव्या पिढीमध्ये देशभक्तीची भावना रुजविण्याचे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. शहीद कुटुंबीयांची काळजी घेणे हे समाज आणि शासन या दोघांचेही कर्तव्य आहे.500यावेळी माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, २५ वर्षांपूर्वी कारगीलच्या बर्फाच्छादित शिखरांवर भारतीय जवानांनी दाखवलेले शौर्य आजही प्रत्येक सैनिकासाठी प्रेरणादायी आहे. कारगीलचा विजय हा केवळ भारतीय लष्कराचा नव्हे, तर संपूर्ण देशाच्या एकजुटीचा विजय होता. आमदार राजेंद्र राऊत यांनी शहीद स्मारकावर येऊन दिलेला सन्मान आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. शहीदांच्या कुटुंबीयांना शासनाच्या सर्व सुविधा वेळेवर मिळाव्यात तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी शासनाने घ्यावी, अशी आमची मागणी आहे. तसेच तरुणांनी मोबाईलच्या आहारी न जाता सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्यासाठी पुढे यावे. कारण देश आहे तर आपण आहोत.

या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य, नगराध्यक्षा सौ. तेजस्विनी कथले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय गरड, उपनगराध्यक्ष रोहित पाटील, पंचायत समिती सभापती सौ. मीनाक्षीताई रोंगे, संभाजी घाडगे, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुभेदार चांगदेव सुरवसे (सेवानिवृत्त), बार्शी तालुका माजी सैनिक संघटनेचे संचालक मंडळ, सर्व सभासद तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या