राष्ट्रीय आयुष वारी … विठ्ठल रुख्माईच्या चरणी केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून पंढरपुरात आयुष सेवा सुविधा केंद्र

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

पंढरपूर, दि. २४ : राष्ट्रीय आयुष वारी … विठ्ठल रुख्माईच्या चरणी .. हा सामाजिक संदेश घेऊन आयुष मंत्रालयाच्या वतीने पंढरपूर येथे भक्तांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विविध ठिकाणी “आयुष सेवा सुविधा केंद्र” उभारण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आयुष मंत्रालयाची सेवा ग्रामीण भागातील जनतेला मिळावी तसेच ग्रामीण भागातही आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार व्हावा, प्राचीन भारतीय आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा लाभ वारकऱ्यांना मिळावा या दृष्टीकोनातून केंद्रीय आयुषमंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून आयुष मंत्रालयाच्या वतीने विठुरायाच्या चरणी आयुष सेवा उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला होता.

त्यानुसार राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत “आयुष सेवा सुविधा केंद्र” आषाढी वारीनिमित्त २४ ते २६ जुलै या कालावधीसाठी उभारण्यात आले आहेत. पंढरपुरात तीन रस्ता येथील महाआरोग्य शिबिर, चंद्रभागेच्या तिरावरील आरोग्य केंद्र वाळवंट आणि आरोग्य केंद्र ६५ एकर या तीन ठिकाणी आयुर्वेदिक, होमिओपॅथी औषध वाटप, योगाबाबत मार्गदर्शन, स्नेहन-स्वेदन (वाफ देणे), वारकऱ्यांसाठी तेल-मसाज, विद्ध-कर्म, अग्नी-कर्म, चरण सेवा, IEC प्रदर्शन ठेवण्यात आले आहे.500आयुष वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील २८ आयुर्वेद, होमिओपॅथी महाविद्यालयांचे डॉक्टर, प्राध्यापक आणि इंटर्न्स आरोग्य सेवा देण्यासाठी सहकार्य करणार आहेत. नेचरफिट संस्थेतर्फे औषध वाटप करण्यात येणार आहे.

२३ जुलै रोजी पंढरपूर येथील ग्रामीण रुग्णालयात आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार, आयुष मंत्रालयातर्फे नियुक्त नोडल अधिकारी चंद्रकांत काटकर, युवराज वाघ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतिश कोपुरवाड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे, आयुष नोडल अधिकारी डॉ. हर्षल जाधव यांच्या समवेत बैठक झाली. त्यानंतर सेवा सुविधा केंद्रावर जाऊन व्यवस्थेची पाहणी करण्यात आली.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या