क्राईमपंढरपूरमहाराष्ट्रसोलापूर

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर पोलिसांची मोठी कारवाई; ११.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

B1न्यूज मराठी नेटवर्क500

पंढरपूर : आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पंढरपूर शहर पोलिसांनी अवैध मद्य वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल ११ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत १ लाख ४२ हजार रुपयांचा देशी-विदेशी मद्यसाठा, एक होंडाई कार आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, सात आरोपींविरुद्ध मुंबई दारूबंदी कायद्यातील कलम ६५ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.500सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत दगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. एमएच-१३-ईसी-६९०८ क्रमांकाच्या होंडाई कारसह एका युनिकॉर्न मोटारसायकल व एका स्कूटीमधून अवैधरित्या मद्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तिन्ही वाहने अडवून तपासणी केली असता, त्यामध्ये देशी व विदेशी मद्याचे एकूण ४२ बॉक्स आढळून आले.

या कारवाईत १ लाख ४२ हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा, एक होंडाई कार आणि दोन दुचाकी असा मिळून ११ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सात आरोपींविरुद्ध मुंबई दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.500ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत दगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, पोलीस उपनिरीक्षक नितीन जगताप, पोलीस हवालदार रोंगे, लोंढे, सुजित उबाळे, शहाजी मंडले, ठाकर, काझी, नवले, रंगे, महिला पोलीस राऊत, तसेच पोलीस कॉन्स्टेबल लोंढे व भांडवड यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button