जयंतीबार्शीमहाराष्ट्र

कर्मवीर सार्वजनिक वाचनालयात डॉ. मामासाहेब जगदाळे यांची जयंती साजरी

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात शब्दांची ज्ञानगंगा अर्थात शिक्षणाची ज्ञानगंगा अंधार असलेल्या घराघरांपर्यंत पोचवून प्रकाशाचा ज्ञानदीप अनेकांच्या घरातील प्रत्येकांच्या मनामनात रुजविणारे प्रज्वलित करणारे थोर शिक्षणमहर्षी, ज्ञानतपस्वी, कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांची १२३ वी समाजदिन म्हणून साजरी करण्यात आली.

प्रथमतः कर्मवीर मामासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख मान्यवरांचे शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी ग्रंथालयाचे सचिव मधुकांत ठोकळ हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भागवत बोबडे , सामाजिक कार्यकर्ते सुहास सुतार, सतीश पाचकुडवे,गायक सुनिल फल्ले आदी उपस्थित होते.यावेळी प्रमुख मान्यवरांनी यथोचित विचार व्यक्त केले. कार्यक्रमासाठी मधुकर वाळुजकर गुरुजी, विलास नेटके, प्रेम अग्रवाल, राहुल लोंढे आदी वाचक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार ग्रंथपाल विनोद गायकवाड यांनी केले.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button