अहिल्यानगरउद्घाटननिधीमहाराष्ट्र

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देणार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी व शनि शिंगणापूर देवस्थानने भाविकांच्या सुविधेसाठी सामंजस्य करार करावा; ५९ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीतून विविध विकासकामांचा शुभारंभ

B1न्यूज मराठी नेटवर्क350

अहिल्यानगर : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांच्या पायाभूत सुविधांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. या विकासकामांमुळे परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळण्यासोबतच आध्यात्मिक पर्यटनातून रोजगाराच्या संधी निर्माण होतील, आणि सर्वांगीण विकासाला चालना मिळेल असा विश्वास राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त सुमारे ५९ कोटी ४० लाख रुपये निधीतून मंजूर झालेल्या विविध रस्ते व पूल कामांचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये शिंगणापूर ते कांगोणी (राज्यमार्ग ६६), सोनई-घोडेगाव-काकणे राज्यमार्ग ६६ वरील लहान पुलाचे बांधकाम, सोनई-कांगोणी ते अहिल्यानगर-संभाजीनगर रस्त्याचे मजबुतीकरण, तसेच कांगोणी-खरवंडी आणि खरवंडी-वडाळा बहिरोबा मार्गाच्या मजबुतीकरणाच्या कामांचा समावेश आहे.350या कार्यक्रमास नेवासा मतदार संघाचे आमदार विठ्ठलराव लंघे, उपजिल्हाधिकारी तथा कार्यकारी अधिकारी, शनी शिंगणापूर देवस्थानचे अतुल चोरमारे, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील गटविकास अधिकारी संजय लखवाल, तहसीलदार संजय बिरादार, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग कोकरे, जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती सायली पाटील, पोलिस उपअधीक्षक राजगुरू यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळा ऐतिहासिक व्हावा यासाठी नियोजन सुरू आहे. या निमित्ताने नाशिकला येणारे भाविक शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथेही मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतील. दोन्ही देवस्थाने जागतिक स्तरावरची असल्याने भाविकांच्या सुविधेसाठी शिर्डी व शनिशिंगणापूर देवस्थानने आपापसांत सामंजस्य करार (MoU) करावा आणि सर्व आवश्यक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना त्यांनी केली. समृद्धी महामार्गामुळे प्रवास सुखकर झाला असून, शिर्डी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी ७०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने आध्यात्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असेही ते म्हणाले.350नेवासा तालुक्यातील दळणवळण अधिक गतिमान करण्यासाठी आणि तीर्थक्षेत्र शनी शिंगणापूरकडे ये-जा करणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी चार महत्त्वाच्या रस्त्यांच्या सुधारणा व लहान पुलाच्या बांधकामासाठी ५९ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या आदेशानुसार या कामांना मंजुरी देण्यात आली असून, सार्वजनिक बांधकाम मंडळ अहिल्यानगर अंतर्गत रो.ह.यो. (कार्य) विभागामार्फत ही कामे केली जाणार आहेत.350सिंचन व रब्बी हंगामाचे नियोजन खरीप आवर्तनाचे योग्य नियोजन झाल्यामुळे ३० हजार हेक्टर क्षेत्राला लाभ झाला आहे. आगामी रब्बी हंगामासाठी १५० बंधारे भरून देण्याचे नियोजन करण्यात आले असून, शिंगवे तुकाई योजनेचे सर्वेक्षण दोन महिन्यांत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेतला. शनिशिंगणापूर देवस्थानच्या अंतर्गत सुविधा व पार्किंगसाठी निधी उपलब्ध झाला असून, तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले समवेत नगराध्यक्ष करणसिंह घुले, शेतकरी व नागरिक संख्येने उपस्थित होते.350

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button