निधीबार्शीमहाराष्ट्र

बार्शी शहराच्या पाणीप्रश्नासाठी आमदार निधीबरोबरच खासदार निधीचीही साथ २१ प्रभागांमध्ये ४२ विंधन विहिरी, सबमर्सिबल पंप, पाण्याच्या टाक्या व कट्ट्यासाठी निधी देण्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे आश्वासन

B1न्यूज मराठी नेटवर्क350

बार्शी : बार्शी शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी आता आमदार निधीबरोबरच खासदार निधीतूनही पाणीपुरवठ्याच्या उपाययोजनांना बळ मिळणार आहे. बार्शी शहरातील २१ प्रभागांमध्ये ४२ विंधन विहिरी (बोअरवेल), सबमर्सिबल पंप, पाण्याच्या टाक्या व कट्टा बांधण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांच्या खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासित केले आहे.

यापूर्वीही खासदार ओमराजे निंबाळकर यांनी विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांच्या कार्यालयास भेट दिली होती. त्या भेटीदरम्यान बार्शी शहरातील वाढती पाणीटंचाई, विविध प्रभागांमध्ये नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या अडचणी तसेच तातडीने करावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा झाली होती.350त्यानंतर नुकतेच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बार्शी येथे भेट दिली असता विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, नगरसेवक मुजम्मिल पठाण,श्री. अजय भानवसे, पृथ्वीराज बाफना यांनी त्यांची भेट घेऊन बार्शी शहराच्या पाणीप्रश्नाबाबत पुन्हा सविस्तर चर्चा केली. या चर्चेदरम्यान बार्शी शहरातील २१ प्रभागांमध्ये ४२ विंधन विहिरी, सबमर्सिबल पंप, पाण्याच्या टाक्या व कट्टा उभारण्यासाठी खासदार निधीतून आवश्यक निधी देण्याचे आश्वासन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिले असून, त्यासंदर्भातील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.350बार्शी शहरातील पाणीप्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत असून, नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा मिळणे ही अत्यावश्यक बाब आहे. त्यामुळे आमदार दिलीपरावजी सोपल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहरातील प्रत्येक प्रभागासाठी उपलब्ध होणाऱ्या विविध निधीच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याच्या सुविधा निर्माण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.

आमदार निधीबरोबरच आता खासदार निधीचीही साथ मिळत असल्याने बार्शी शहरातील पाणीप्रश्न सोडविण्याच्या प्रयत्नांना अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होणार आहे. याबाबत विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी माहिती दिली. बार्शीकरांना पाणी मिळावे, प्रत्येक प्रभागातील नागरिकांना पाण्याची उपलब्धता वाढावी आणि पाणीटंचाईच्या काळात नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी पुढील काळातही सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.350

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button