रामदास आठवले विद्यालयात खुद्द केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी च साधला विद्यार्थ्यांशी संवाद

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

हिंगोली : हिंगोली जिल्हातील औंढा नागनाथ तालुक्यातील माथा या गावातील रामदास आठवले विद्यालयाला आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी भेट दिली.यावेळी खुद्द रामदास आठवले यांनी आपल्या नावाच्या शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.ज्यांच्या नावाने आपली शाळा आहे ते रामदास आठवले आपल्या शाळेत भेट देऊन आपल्याशी संवाद साधत आहेत याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.500

हिंगोलीच्या दौऱ्यावर ना.रामदास आठवले असताना त्यांच्या नावाने असलेले रामदास आठवले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, माथा (ता. औंढा नागनाथ., जि. हिंगोली) येथील मुख्याध्यापकांनी शाळेसमोरील मैदानावर पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन दिले.

यावेळी ना.रामदास आठवले यांनी आपल्या खासदार निधीतून रुपये 20 लाख निधी या शाळेला देणार असल्याचे तसेच शाळेला 20 कॉम्प्युटर देणार असल्याचे सांगत सी एस आर फंडातून अधिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.500विद्यार्थ्यांशी संवाद साधला…आपल्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणी सांगताना आपण महाविद्यालयात विद्यार्थी दशेत ही दलित पँथर चळवळीचे काम करीत होतो त्याची आठवणी ना.रामदास आठवले यांनी सांगितल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आदर्श घेऊन शिक्षण घ्या; आई वडिलांच्या कष्टाची जाण ठेऊन शिका उच्च शिक्षण घेऊन आपली गरिबी दूर करा ; असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले

ग्रामीण भागातील या शाळेत शिक्षण घेणाऱ्या सुमारे ५६५ विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या व सुरक्षित सुविधा मिळाव्यात, यासाठी या मागणीचा विचार करून या महाविद्यालयास कला वाणिज्य सोबत विज्ञान शाखेची परवानगी मिळवून देण्यासाठी उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे शिफारस करणार असल्याचे आश्वासन ना. रामदास आठवले यांनी दिले.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या