संजू उत्तम चव्हाण यांनी स्वीकारला कोकण विभागीय उपसंचालक (माहिती) पदाचा कार्यभार

0

कोकण विभागीय माहिती कार्यालयाला मिळाले नवे उपसंचालक

B1न्यूज मराठी नेटवर्क500

नवी मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागीय उपसंचालक (माहिती) या रिक्त पदावर सरळ सेवेने नवनियुक्त झालेले संजू उत्तम चव्हाण यांनी मंगळवारी आपल्या पदाचा कार्यभार अधिकृतपणे स्वीकारला आहे. नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील कोकण भवनमधील विभागीय माहिती कार्यालयातील उपसंचालकांच्या दालनात एका छोटेखानी आणि उत्साही कार्यक्रमात हा पदभार सोहळा संपन्न झाला. 500आतापर्यंत या रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार ठाणे जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्याकडे होता. त्यांनी अत्यंत यशस्वीपणे ही जबाबदारी सांभाळत आज नवनियुक्त उपसंचालक चव्हाण यांच्याकडे या पदाची अधिकृत सूत्रे सुपूर्द केली आणि त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले.500या सोहळ्याप्रसंगी ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्यासह विभागीय माहिती कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय कोकण विभागांतर्गत येणाऱ्या ठाणे, रायगड, पालघर आणि रत्नागिरी येथील जिल्हा माहिती कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डिजिटल माध्यमातून म्हणजेच दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या