अमावस्या ऑल आऊट अभियान, दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या “अमावस्या ऑल आऊट” विशेष मोहिमेअंतर्गत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच रस्ते अपघातांना प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने विशेष वाहन तपासणी व नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेदरम्यान रात्रीच्या वेळी विविध ठिकाणी वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान दारूच्या नशेत वाहन चालविताना आढळून आलेल्या चार वाहनचालकांवर मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 185 अन्वये कारवाई करण्यात आली.5000या कारवाईतील विशेष बाब म्हणजे लातूर येथून पुण्याकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या एका लक्झरी बसचा चालक दारूच्या नशेत वाहन चालविताना आढळून आला. सदर बसमध्ये सुमारे 32 प्रवासी प्रवास करत होते. चालकाने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून सर्व प्रवाशांच्या जीविताशी खेळ करत त्यांचा जीव धोक्यात घातला होता. पोलिसांनी तात्काळ बस थांबवून चालकाची वैद्यकीय तपासणी केली असता तो मद्यधुंद असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर मोटार वाहन अधिनियमाच्या कलम 185 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली.500बार्शी तालुका पोलीस स्टेशनतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे की, दारू पिऊन वाहन चालविणे हे स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण करणारे कृत्य असून अशा वाहनचालकांविरुद्ध भविष्यातही कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई सुरू राहणार आहे.

सदर विशेष मोहिमेत सुहास जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी, बार्शी, सपोनि अक्षय सोनवणे प्रभारी अधिकारी बार्शी, पो. उपनि. शिरगिरे, ग्रेड पीएसआय यावलकर, ट्रॅफिक पोना जगताप, पोना माने व पोना चौधरी यांनी सक्रिय सहभाग घेऊन सदरची कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या