आंदोलनबार्शीमहाराष्ट्र

दिवाळीपूर्वी बोनस न दिल्यास २५ ऑक्टोबर पासून बेमुदत काम बंद करून आंदोलनाचा इशारा…….

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : नगर परिषदेतील स्वच्छतेचा ठेका VDK फॅसीलिटीज कंपनीने घेतला असून यात घरोघरी जाऊन कचरा संकलित करणे व शहरातील नेमून दिलेल्या रस्ते सफाईच्या हद्दी स्वच्छ करणे या कामाचा समावेश आहे. यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेकदा निवेदन देऊनही कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार देणे, वेतन चिट्टी देणे, हजेरीबाबतची माहिती मिळावी यासाठी हजेरी पुस्तकं मिळावी, पगार वेळेवर मिळावा यासाठी अनेकदा आंदोलनेही कामगारांनी केली पण दिवाळीपूर्वी बोनस मिळावा या मागणीसाठी आता कामगार आक्रमक झाले आहेत दिवाळीपूर्वी बोनस न मिळाल्यास काम बंद करून आंदोलनाचा इशारा दिला आहे यात मुख्याधिकारी श्री बाळासाहेब चव्हाण यांनी लक्ष घालून कामगारांना न्याय मिळवून द्यावा अश्या आशयाचे लेखी पत्र कामगार संघटनेकडून देण्यात आले आहे

नगर परिषद पांढरा हत्ती पोसत आहे का? अश्या प्रकारची भावना नागरिकांमधून व्यक्त होतं आहे दरमहा ६० लाखांपर्यंत कंपनीचे बिल होतं आहे यात नगर परिषदेने वेळोवेळी कामगारांच्या पगारापुरतेच बिल कंपनीला अदा केले आहे नगर परिषदेत पैसे नसतानाही अश्या कंपन्या कोणाच्या फायद्यासाठी पालिका पोसत आहे हार्दिक महत्वाचा प्रश्न आहे नगर परिषदेने आजपर्यंत या कंपनीला जवळपास ५-६ कोटी रुपयांचे बिल देणे आहे व जोपर्यंत नगरपरिषद आम्हास बिल अदा करत नाही तोपर्यंत आम्ही काहीही देऊ शकत नाही अश्या प्रकारची भूमिका कंपनीच्या संचालकांकडून घेण्यात आल्याचेही बोलले जात आहे.

यापूर्वीच्या BVG कंपनीलाही जवळपास ४ ते ४.५ कोटी रुपये नगर परिषद आजपर्यंत देऊ शकली नाही जर अश्या प्रकारच्या कंपन्यांना नगर परिषद बिल देऊ शकत नसेल तर हा हट्ट कशाकरिता केला जातो नं कर्मचाऱ्यांना न्याय, ना नागरिकांचे समाधान मग एवढा खर्च करून फायदा नेमका कोणाला?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button