महाराष्ट्रमुंबईयोजना

कामगार विभागाच्या सेवा व योजनांची प्रक्रिया अधिक सुलभ होणार कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

२९ सेवा आणि १८ योजनांच्या शासकीय प्रक्रिया पुनर्रचनेस मान्यता नवीन पोर्टल नजीकच्या काळात होणार कार्यान्वित

B1न्यूज मराठी नेटवर्क350

मुंबई : कामगार विभागाच्या २९ सेवा आणि १८ योजनांच्या शासकीय प्रक्रिया पुनर्रचनेस (जीपीआर) मान्यता देण्यात आली आहे. यामुळे कार्यालयीन फेऱ्या, अर्जातील रकाने, आवश्यक कागदपत्रे, मंजुरीचे स्तर आणि सेवा मंजुरीचा कालावधी कमी होणार आहे. या सेवा व योजनांसाठी तयार करण्यात येणारे पोर्टल नजीकच्या काळात कार्यान्वित केले जाईल. त्यामुळे नागरिक आणि व्यावसायिकांना लाभ होईल, असे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी सांगितले आहे.350मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली २७ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या राज्यस्तरीय शासकीय प्रक्रिया पुनर्रचना समितीच्या बैठकीत कामगार विभागाच्या २९ जी-टू-बी व जी-टू-सी सेवा आणि १८ योजनांची प्रक्रिया पुनर्रचना अंतिम करण्यास सहमती देण्यात आली. त्यानुसार कामगार विभागाने १७ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे या प्रक्रियेला मान्यता दिली आहे.

या पुनर्रचनेनुसार आवश्यक अर्ज, कागदपत्रे, मंजुरीचे स्तर तसेच अंतिम सेवा मान्यतेसाठीचे दाखले व प्रमाणपत्रांमध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत. या सर्व सेवा व योजनांचा लाभ अधिक सुलभपणे देण्यासाठी स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात येत आहे.350

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button