पंढरपूरप्रशासनमहाराष्ट्रसोलापूर

कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात सलग तीन दिवस अतिक्रमण हटाव मोहीम, आपत्कालीन सेवांसाठी रस्ते केले मोकळे; अनधिकृत अतिक्रमण केल्यास कठोर कारवाईचा इशारा

B1न्यूज मराठी नेटवर्क350

पंढरपूर, दि. (१७) : कार्तिकी वारी महायात्रा २०२६ च्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात दाखल होणाऱ्या लाखो भाविकांची सुरक्षितता आणि गर्दीचे नियोजन लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शहरात सलग तीन दिवस विशेष अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. पंढरपूर नगरपरिषद, जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही धडक कारवाई करण्यात आली. असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.

रविवार, दि. १५ नोव्हेंबर ते मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर या कालावधीत शहरातील प्रमुख रस्ते, मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग आणि चंद्रभागा वाळवंट परिसरातील अनधिकृत अतिक्रमणे हटविण्यात आली.350पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्टेशन रोड, चौफाळा ते महाद्वार घाट, अहिल्यादेवी चौक ते गजानन महाराज मंदिर तसेच चंद्रभागा वाळवंट परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. यामध्ये अनधिकृत टपऱ्या आणि उसाच्या दुकानांचाही समावेश होता. संबंधित व्यावसायिकांना सार्वजनिक जागेवर पुन्हा अतिक्रमण न करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

दुसऱ्या दिवशी स्टेशन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चौफाळा रोड आणि गांधी रोड ते प्रदक्षिणा मार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात आली. चौफाळा ते मंदिर परिसरातील दुकानदारांना दुकाने व विक्रीचे साहित्य पांढऱ्या पट्टीच्या आत ठेवण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या.350तिसऱ्या दिवशी चौफाळा ते मंदिर परिसरातील पांढऱ्या पट्टीबाहेरील अतिक्रमणे हटविण्यात आली. तसेच प्रदक्षिणा मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अर्बन बँक आणि गजानन महाराज मठ ते भक्ती मार्ग या परिसरातील रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यात आली.

या संयुक्त मोहिमेसाठी तीन दिवसांत पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. पहिल्या दिवशी २ पोलीस अधिकारी व ४ कर्मचारी, दुसऱ्या दिवशी ३ पोलीस अधिकारी, ८ कर्मचारी व ५ होमगार्ड, तर तिसऱ्या दिवशी २ पोलीस अधिकारी, ९ कर्मचारी व १० होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात आली होती.350कार्तिकी वारीदरम्यान वारकऱ्यांना रुग्णवाहिका, अग्निशामक दल यांसारख्या आपत्कालीन सेवा विनाव्यत्यय उपलब्ध व्हाव्यात, तसेच गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना टाळता यावी, यासाठी रस्ते व सार्वजनिक जागा मोकळ्या ठेवणे आवश्यक आहे. या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, नगरपरिषदेचे अधिकारी व २० कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड यांनी सहभाग घेतला. शहरात यापुढे अनधिकृत अतिक्रमण केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ मधील लागू तरतुदींनुसार कठोर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.350

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button