प्रशासनमहाराष्ट्ररत्नागिरी

विहिरीत पडलेल्या दुर्मीळ काळ्या बिबट्याला जीवदान; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्याकडून वनविभागाच्या कामगिरीचे कौतुक

B1न्यूज मराठी नेटवर्क350

रत्नागिरी, दि. १८ : वनविभागाने अत्यंत धाडसाने विहिरीत पडलेल्या दुर्मीळ काळ्या बिबट्याच्या (ब्लॅक पॅंथर) पिल्लाला सुखरूप रेस्क्यू करून जीवदान दिले आहे. या यशस्वी मोहिमेनंतर राज्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी जिपळूण येथील वन विभागाच्या कार्यालयाला भेट देत वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनापासून अभिनंदन केले.

यावेळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ, उप विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, सहायक वन अधिकारी प्रियांका लगड आदी उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी वनविभागाच्या कार्यतत्परतेचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, “ब्लॅक पॅंथर हा अत्यंत दुर्मीळ असून त्याचे अस्तित्व फार कमी ठिकाणी पाहायला मिळते. मात्र, गेल्या तीन-चार महिन्यांत जिल्ह्यात अशा प्रकारे ब्लॅक पॅंथर आढळण्याची आणि वनविभागाने त्यांना सुखरूप वाचवण्याची ही दुसरी घटना आहे. या कामगिरीवरून वनविभागाची रेस्क्यू टीम संपूर्ण महाराष्ट्रात ‘नंबर वन’ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.”350जिल्ह्यातील महिला वनाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना डॉ. सामंत पुढे म्हणाले, “आमच्या जिल्ह्याच्या दोन्ही प्रमुख वनाधिकारी या महिला आहेत. महिला असूनही अत्यंत सक्षमपणाने आणि धाडसाने त्या अशा आक्रमक वन्यप्राण्यांना हाताळतात आणि रेस्क्यू करतात, ही अभिमानास्पद बाब आहे.

त्यांचे शंभर टक्के कौतुक केलेच पाहिजे.” हा प्राणी स्वभावतः आक्रमक असूनही या संपूर्ण मोहिमेदरम्यान त्याने कोणत्याही नागरिकाला किंवा कर्मचाऱ्याला इजा पोहोचवली नाही आणि वनविभागानेही त्याला कोणतीही हानी न पोहोचवता अत्यंत कुशलतेने सुरक्षित बाहेर काढले, याबद्दल पालकमंत्र्यांनी संपूर्ण टीमचे आभार मानले. या घटनेमुळे परिसरात या दुर्मीळ काळ्या बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांमध्ये मोठे कुतूहल पाहायला मिळाले.350

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button