बार्शीत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन साजरा

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम व श्रद्धापूर्वक पार पडला. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.
या प्रसंगी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा जागर करत त्यांच्या हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी आणि जनसामान्यांसाठी लढणाऱ्या कार्याची आठवण उपस्थितांनी करून दिली. तसेच संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमात उपस्थित पदाधिकारी व शिवसैनिकांनी कायम एकनिष्ठ राहू” असा निर्धार व्यक्त करत बाळासाहेबांच्या विचारांशी आणि शिवसेनेच्या तत्त्वांशी अखंड निष्ठा ठेवण्याची ग्वाही दिली. विचारांशी तडजोड न करता समाजहितासाठी कार्य करत राहण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.यावेळी जेष्ठ शिवसैनिक आण्णा डोईफोडे, मंगल ताई पाटील, माजी नगरसेवक बापू जाधव,देवा दिंडोरे, धनाजी वाणी, भीमराव गंधुरे,बाळासाहेब मुढे,युवासेनेचे राज्य विस्तारक हेमंत रामगुडे ,युवासेना जिल्हाप्रमुख पांडुरंग घोलप, युवासेना जिल्हासचिव दिपक तिवाडी , युवासेना तालुकाप्रमुख स्वराज क्षीरसागर, युवासेना शहर प्रमुख अर्जुन सोनवणे, किरण स्वामी ,शैलेश माने यांच्या सह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
उपस्थितांनी बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी उपस्थित शिवसैनिक यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनातील आठवणींना उजाळा दिला.




