प्रशासनबार्शीमहाराष्ट्र

सपोनि अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली बार्शी तालुका पोलिसांचा सिनेस्टाईल थरार!दीड किलोमीटर पाठलाग करून संशयितांना पकडले; दोन कारवायांत ३ वाहनांसह ६ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त!

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत जनावरांची निर्दयतेने वाहतूक करणारे तसेच संशयित गोमांसाची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध बार्शी तालुका पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये पोलिसांनी तब्बल ६ लाख ३८ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी संशयितांच्या दोन मोटारसायकलींचा सुमारे दीड किलोमीटर सिनेस्टाईल पाठलाग करून तिघांना पकडले. या कारवाईत चार जनावरे, अंदाजे ५५ किलो संशयित गोमांस, एक बोलेरो पिकअप आणि दोन मोटारसायकली असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बार्शी-कुसळंब रोडवरील कुसळंब चौक येथे महिंद्रा कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअपमधून जनावरांची निर्दयतेने वाहतूक होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.350पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये दोन काळ्या-पांढऱ्या रंगाच्या जर्सी गायी, एक काळ्या-तांबड्या रंगाची देशी गाय आणि एक देशी खोंड अशी एकूण चार जनावरे आढळून आली. सदर जनावरे वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक दाटीवाटीने भरलेली होती. त्यांना हालचाल करण्यास पुरेशी जागा नव्हती. तसेच चारा, पाणी व औषधोपचाराची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्याचे तपासणीत आढळले. या प्रकरणी पोलिसांनी चार जनावरे आणि बोलेरो पिकअप वाहन असा एकूण ४ लाख ४१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये राजू तानाजी थोरात (वय ३४, रा. बाभूळगाव, ता. बार्शी), राजू मुनाफ सौदागर (रा. मंगळवार पेठ, बार्शी) आणि कपिल कलीम सौदागर (रा. मंगळवार पेठ, बार्शी) यांच्याविरुद्ध बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६६/२०२६ अन्वये प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६०, प्राण्यांना परिवहन नियम १९७८, महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९७६ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास गोपनीय बातमीदारामार्फत पोलिसांना माहिती मिळाली की, भूम रोडवरील मौजे धसपिंपळगाव परिसरातून दोन मोटारसायकलींवरून तीन इसम संशयित गोमांस घेऊन जात आहेत. ही माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आणि पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब शिरगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. 350यावेळी दोन मोटारसायकलींवरून तिघेजण जात असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मोटारसायकलींचा वेग वाढवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हार न मानता सुमारे दीड किलोमीटरपर्यंत पाठलाग केला आणि तिन्ही संशयितांना पकडण्यात यश मिळवले. पकडण्यात आलेल्या इसमांची नावे मारुफ महंमद सौदागर (वय २३), उजेफ महंमद सौदागर (वय २२) आणि नुरेन इरफान सौदागर (वय २३), सर्व रा. मंगळवार पेठ, बार्शी अशी आहेत. पोलिसांनी दोन्ही मोटारसायकलींची तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे ५५ किलो संशयित गोमांस आढळून आले. पंचांसमक्ष पंचनामा करून सदर मांस व दोन्ही मोटारसायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्या. यामध्ये अंदाजे ३० किलो मांसाची किंमत १५ हजार रुपये, तर २५ किलो मांसाची किंमत १२ हजार ५०० रुपये अशी निश्चित करण्यात आली. तसेच हिरो होंडा पॅशन प्रो मोटारसायकलची किंमत ७५ हजार रुपये आणि होंडा शाईन मोटारसायकल क्रमांक एमएच १३ एफडी ८३७१ ची किंमत ९५ हजार रुपये असा एकूण १ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.350या प्रकरणी पशुसंवर्धन विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना माहिती देण्यात आली असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मांसाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. या प्रकरणी महमदनूर कुरेशी आणि इब्बू कुरेशी यांचीही नावे तक्रारीत नमूद करण्यात आली आहेत. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३२५, ३(५) तसेच महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९७६ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोन्ही कारवायांमध्ये चार जनावरे – ४१,००० रुपये, बोलेरो पिकअप वाहन – ४,००,००० रुपये, अंदाजे ५५ किलो संशयित गोमांस – २७,५०० रुपये, दोन मोटारसायकली – १,७०,००० रुपये असा एकूण ६,३८,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आणि पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब शिरगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या. या कारवाईत राजेंद्र मंगरुळे, अमृत खेडकर, युवराज गायकवाड, हनुमंत काळेळ, श्रीमंत खराडे, महेश माने, अमृता गुंड आणि प्रदीप जगताप या पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला.350

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button