माधवबागमुळे हृदयरुग्णांचे आयुष्य सुखकर

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : माधवबाग बार्शी व धाराशिव शाखेमध्ये नुकताच जागतिक हृदयदिन उत्साहात साजरा करण्यात आला. हृदयरोगावर यशस्वी मात केलेल्या रुग्णांचा यावेळी सन्मान करण्यात आला. माधवबाग मधील उपचारांमुळे आयुष्यात झालेल्या सकारात्मक बदलांविषयी यावेळी रुग्णांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या. प्रमुख पाहुणे मदन दराडे व श्री बालाजी यरमुनवाड यांनी रुग्णांचे कौतुक करून निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. पंचकर्म डायट बॉक्सेस व योग्य जीवनशैलीच्या मदतीने हृदयविकारांना नक्कीच दूर ठेवता येते असे डॉक्टर क्रांती कोळी व डॉक्टर पवन कोळी यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी बार्शी व धाराशिव शाखेच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
अँजिओग्राफी,अँजिओप्लास्टी, बायपास झालेल्या किंवा करून घेण्याचा सल्ला मिळालेल्या तसेच हृदयरोगाचे रिस्क फॅक्टर्स असणाऱ्या मधुमेह, उच्च रक्तदाब, वाढलेले वजन व कोलेस्टेरॉल असे त्रास असणाऱ्या रुग्णांवरती माधवबागमध्ये उपचार केले जातात. संशोधनसिद्ध व पुराव्यांवर आधारित पंचकर्म, डायटबॉक्समुळे माधवबागच्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सेला जगभरातील हृदयरोग तज्ञांकडून मान्यता प्राप्त आहे.
हृदय रोगावर विनाशस्त्रक्रिया आयुर्वेदिक उपचार करण्यासाठी अग्रणीय असणाऱ्या माधवबाग संस्थेचा पुढील काही काळात भारतासोबतच अमेरिका,युरोप व युनायटेड अरब अमिरात या ठिकाणी विस्तार होणार आहे.