महाराष्ट्रमुंबई

केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

मुंबई दि.9 : महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम जिष्णू देव वर्मा यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी लोकभवन येथे सदिच्छा भेट घेतली.बुद्धमूर्ती आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भेट देऊन राज्यपालांचा शाल पुष्पगुच्छ देऊन ना. रामदास आठवले यांनी सत्कार केला.5000
महाराष्ट्रातील धर्मांतरित बौद्धांची जनगणनेत अनुसूचित जातीत नोंद करण्यात यावी.राज्यात ज्यांनी अनुसूचित जातीतून बौद्ध धम्मात धर्मांतर केले आहे अशा नवबौद्ध समाजाची नोंद जनगणनेत अनुसूचित जातीत व्हावी या मागणीबाबत ना. रामदास आठवले यांनी महामहीम राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्याशी सविस्तर चर्चा करून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धर्मांतराचा इतिहास सांगितला.
5000
तसेच अनुसूचित जाती जमाती; इतर मागासवर्गीय सरकारी कर्मचाऱ्यांना – अधिकाऱ्यांना पदोन्नती मधील आरक्षण लागू करावे आणि गायरान जमिनीवरील 14 एप्रिल 2000 सालापर्यंत चे अतिक्रमण नियमित करावे या मागण्यांचे निवेदन ना. रामदास आठवले यांनी राज्यपालांना दिले. या निवेदनातील विषयांवर राज्यसरकारला निर्देश देण्याची मागणी ना. रामदास आठवले यांनी राज्यपालांना केली. त्यावर निवेदन वाचून प्रश्नांचा अभ्यास करून निर्णय घेणार असल्याचे आश्वासन राज्यपाल महामहीम जिष्णू देव वर्मा यांनी ना.रामदास आठवले यांना दिले. यावेळी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शिष्टमंडळाने ही ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वात राज्यपालांची भेट घेतली. त्यात पी ए सोसायटीचे उपाध्यक्ष पद्मश्री सुखदेव थोरात; वासुदेव गाडे; चंद्रशेखर कांबळे यांचा समावेश होता.
50000यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर ;राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; युवक आघाडी अध्यक्ष पप्पू कागदे; कांतिकुमार जैन; मराठा आघाडी चे अध्यक्ष पोपट शेठ घनवट, अल्पसंख्यांक आघाडी मुंबई अध्यक्ष सोहेल शेख; चंद्रपूर चे रिपाइं नेते अशोक घोटेकर; सुनील बन्सी मोरे; आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button