कल्पना अक्कलकोटे यांचे वीरशैव पंडित परीक्षेत यश

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : श्री काशी जगद्गुरू विश्वाराध्य वीरशैव विद्यापीठ वाराणसीच्या वतीने घेण्यात आलेल्या वीरशैव पंडित परीक्षेत बार्शीच्या कल्पना नागेश अक्कलकोटे या सोलापूर जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत.

महाराष्ट्र विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या अक्कलकोटे यांनी श्री गुरु मणीकंठ शिवाचार्य दहीवडकर महाराज यांच्या मार्गदर्शाखाली हा अभ्यासक्रम पूर्ण केला. ७० टक्के गुण घेऊन त्या सोलापूर जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. या यशाबद्दल काशी जगद्गुरू तसेच बार्शीतील सर्व शिवाचार्य, माजी मंत्री दिलीप सोपल, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉ. बी. वाय. यादव, पी. टी. पाटील, नंदन जगदाळे, विष्णू पाटील, जयकुमार शितोळे यांनी अभिनंदन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या