प्रशासनमहाराष्ट्रसोलापूर

सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगची सुविधेबाबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडून आढावा, फ्लाय 91 व स्टार या विमान कंपन्यांनी सोलापूर विमानतळावरील विमानसेवा सुरळीत ठेवावी

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

सोलापूर : होटगी रोड येथील विमानतळावरून नाईट लँडिंगची सुविधा सुरू करण्याच्या अनुषंगाने येणाऱ्या अडथळ्या बाबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सोलापूर विमानतळ प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती घेतली. तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी विमान सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला असून फ्लाई नाईन्टी वन तसेच स्टार या विमान कंपन्यांनी मौसमी पावसाचे कारण सांगून सोलापूर ते मुंबई व सोलापूर ते गोवा ही विमानसेवा बंद ठेवणे व ती सुरळीत राहील याबाबतचा सकारात्मक निर्णय पुढील आठ दिवसात घ्यावा अशा सूचना त्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागात आयोजित सोलापूर विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा सुरू करण्याच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्तिकेयन मार्गदर्शन करत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, सोलापूर विमानतळाचे टर्मिनल मॅनेजर माधव संतोष, व्यवस्थापक अंजनी कुमारी शर्मा, प्रांत अधिकारी सदाशिव पडदुने उपस्थित होते. तसेच फ्लाय 91 व स्टार विमान कंपनीचे व्यवस्थापक दूरदृष्य प्रणाली द्वारे बैठकीत सहभागी झालेले होते.5000
जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी होटगी रोड येथील सोलापूर विमानतळावरून नाईट लँडिंगची सुविधा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबी तसेच यासाठी अडथळा ठरणाऱ्या अनुषंगिक बाबीवर सविस्तर चर्चा केली. विमानतळाचे टर्मिनल मॅनेजर श्री माधव संतोष यांनी सोलापूर विमानतळावर नाईट लँडिंग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबीची सविस्तर माहिती यावेळी दिली.

विमानतळ व्यवस्थापक अंजनी कुमारी शर्मा यांनी विमानतळावर नाईट लँडिंग साठी 140 मीटरचा रणवे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच यासाठी लोकोलायझर ही मशिनरी आवश्यक असून त्यासाठी काही अडथळे येत असून सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या एका चिमणीचाही अडथळा निर्माण झालेला आहे. तसेच विमानतळ साठी असलेल्या जागेवर अतिक्रमणे झालेले असून यातील ए विंग मधील अतिक्रमण बाबत सोलापूरच्या सिविल कोर्टनेस ते दिलेला असून बी विंग मधील अतिक्रमणे मोठ्या प्रमाणावर असून या ठिकाणी उच्च न्यायालयाने स्टे दिलेला आहे.

तांत्रिक सुविधा उभारणीचा खर्चDVOR, रनवे लाइटिंग, अप्रोच लाइटिंग, इलेक्ट्रिकल अपग्रेड व बाउंडरी वॉलसाठी सुमारे 30 कोटी रुपये.नवीन टर्मिनल बिल्डिंग, एप्रन व टॅक्सीवे मजबुतीकरणासाठी 100 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.5000सोलापूर विमानतळावर रात्रीच्या वेळी विमानांची सुरक्षित लँडिंग सुरू करण्यासाठी आवश्यक तांत्रिक सुविधा उभारण्यापूर्वी कायदेशीर व जमीनसंबंधी अडथळे आहेत –
मजरेवाडी सर्व्हे नं. 71 : 57 एकर क्षेत्रात तात्पुरती शेड्स असून मालकी हक्कावरील वाद जिल्हा न्यायालयात प्रलंबित आहे.मजरेवाडी सर्व्हे नं. 73 व 64 : एकूण 39 एकर क्षेत्रात शेकडो घरे असून उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश दिला आहे. कुमठे सर्व्हे नं. 20, 21A : तीन एकर क्षेत्रात एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया कडे ताबा असला तरी उच्च न्यायालयाने पुढील विकासकामांवर स्थगिती दिली आहे.
जमीन अधिग्रहणाचा प्रश्न- मजरेवाडी व कुमठे गावातील एकूण 50 एकर अतिरिक्त जमीन आवश्यक आहे. जमीन अधिग्रहणासाठी अंदाजे 696 कोटी रुपये (रेडी रेकनर दरानुसार) तर 1069 कोटी रुपये (सेल डीड दरानुसार) खर्च अपेक्षित आहे.

*सोलापूरची विमान सेवा सुरळीतपणे सुरू ठेवावी-
सोलापूर येथून हवाई वाहतूक सेवेला सुरुवात झाल्यापासून जिल्ह्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. तरी फ्लाय 91 व स्टार या प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमान कंपन्यांनी मोसमी पावसातील दृश्यमानता चे कारण देऊन सोलापूर ते मुंबई व सोलापूर ते गोवा ही प्रवासी हवाई वाहतूक सेवा बंद ठेवण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा असून या कंपन्यांनी याबाबत विचार करावा व पुढील आठवड्यात या अनुषंगाने निर्णय घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिल्या
.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button