बार्शीमहाराष्ट्र

“कला ही केवळ मनोरंजनाचे साधन नाही, ती समाजपरिवर्तनाची शक्ती आहे” – श्रीधर कांबळे

आबूरोड येथे ब्रह्माकुमारींच्या कला एवं संस्कृती प्रभागाच्या राष्ट्रीय संमेलनाच्या स्वागत सत्रात शुभेच्छापर मनोगत

B1न्यूज मराठी नेटवर्क5प0प0

बार्शी : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या कला एवं संस्कृती प्रभागाच्या वतीने आयोजित चार दिवसीय राष्ट्रीय संमेलनाचा भव्य शुभारंभ राजस्थानातील आबूराज येथील ब्रह्माकुमारींच्या ज्ञानसरोवर परिसरात अत्यंत गरिमामय व आध्यात्मिक वातावरणात झाला. देशभरातून आलेले कलाकार, साहित्यिक, संगीतकार, नृत्यकार तसेच विविध कला क्षेत्रांतील प्रतिनिधी यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संमेलनाचा पहिला दिवस (दि. २५ जून २०२६) प्रेरणादायी वातावरणात पार पडला.5000प्रथम दिवशी आयोजित स्वागत सत्रात बार्शीचे ज्येष्ठ नाट्यकलावंत व सोलापूर जिल्हा नाट्य कलाकार मंचाचे उपाध्यक्ष श्रीधर कांबळे हे विशिष्ट अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी बी.के. अविनाश भाई यांनी परमात्म स्मृतीचे गीत सादर केले, तर रायपूर समूहाने सामूहिक नृत्याद्वारे उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर “सेवेचे सरोवर – जिथे कला सेवा बनते” या विषयावरील प्रभावी नाटिका सादर करण्यात आली. तसेच कला एवं संस्कृती प्रभागाचा परिचय करून देणारी माहितीपूर्ण चित्रफीतही प्रदर्शित करण्यात आली.

मुख्य स्वागत समारंभात राष्ट्रीय संयोजिका राजयोगिनी बी.के. प्रेम दीदी यांनी कला ही मानवकल्याण आणि आध्यात्मिक जागृतीचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. उपाध्यक्ष बी.के. दयाल भाई आणि अध्यक्षा बी.के. करुणा बहन यांनी कलाकारांनी आपल्या कलेचा उपयोग समाजनिर्मिती व मूल्यसंवर्धनासाठी करावा, असे आवाहन केले. राजयोगिनी बी.के. चंद्रिका दीदी यांनी कला ही ईश्वरीय सेवेचे सशक्त माध्यम असून कलाकारांनी आपल्या कलेतून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणावे, अशी प्रेरणा दिली.

यावेळी विशिष्ट अतिथी म्हणून मनोगत व्यक्त करताना श्रीधर कांबळे यांनी “आधुनिक संस्कृतीमध्ये कौटुंबिक मूल्यांच्या संवर्धनाची कला” या विषयावर विचार मांडले. “कला ही केवळ मनोरंजनाचे साधन नाही, ती समाजपरिवर्तनाची शक्ती आहे. कलाकार हा समाजाचा केवळ मनोरंजनकर्ता नसून संस्कारकर्ता देखील असतो,” असे प्रतिपादन त्यांनी केले.

भारतीय संस्कृतीची खरी ताकद कुटुंबव्यवस्थेत असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात संवाद, प्रेम आणि संस्कार जपणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. ब्रह्माकुमारी संस्थेने अध्यात्म आणि मूल्याधिष्ठित जीवनाचा दिलेला संदेश समाजाला नवी दिशा देणारा असून, कला आणि अध्यात्म यांचा संगमच सुदृढ, सुसंस्कृत व मूल्याधिष्ठित समाज घडविण्यास सक्षम ठरतो, असेही त्यांनी नमूद केले.50000या प्रसंगी राजयोगिनी बी.के. पूनम दीदी, सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका उपाध्याय तसेच एस-२ डान्स अकादमी, दिल्लीचे संचालक जलज चौधरी यांनीही शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. राजयोगिनी बी.के. कुसुम दीदी यांनी सर्वांना राजयोग ध्यानाचा सुंदर अनुभव दिला. समारोपप्रसंगी संयुक्त मुख्य प्रशासिका राजयोगिनी बी.के. सुदेश दीदी यांनी कला आणि अध्यात्म यांचा संगम समाजात शांतता, प्रेम व संस्कारांचा प्रसार घडवून आणतो, असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी बी.के. अनिल भाई यांनी आभार मानले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन राजयोगिनी बी.के. तपस्विनी बहन यांनी केले. देशभरातून सहभागी झालेल्या कलाकारांच्या उत्साही उपस्थितीमुळे संमेलनाचा पहिला दिवस संस्मरणीय, प्रेरणादायी आणि सेवाभाव वृद्धिंगत करणारा ठरला.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button