जयंतीबार्शीमहाराष्ट्रसत्कार

छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त बार्शीत विशेष सन्मान व व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्ट, बार्शी यांच्या वतीने परिवर्तनाच्या चळवळीचे आधारस्तंभ राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त विशेष सन्मान व व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवार, दि. २९ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता श्रावस्ती बुद्ध विहार, महात्मा फुले नगर, चांडक पेट्रोल पंपाच्या मागे, कुर्डुवाडी रोड, बार्शी येथे होणार आहे.50000या कार्यक्रमासाठी राज्यसभा सदस्या मा. खा. प्रा. डॉ. ज्योतीताई वाघमारे या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच श्रावस्ती बुद्ध विहार, बार्शीचे भंते सुमेधजी नागसेन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये संगीत क्षेत्रातील भीम टायगर सामाजिक संस्था, बार्शी, सामाजिक क्षेत्रातील ओन्ली समाजसेवा संस्था, बार्शी, वृक्षारोपण क्षेत्रातील वृक्षसंवर्धन समिती, बार्शी आणि गोशाळा क्षेत्रातील जाणीव फाउंडेशन, बार्शी यांचा गौरव करण्यात येणार आहे.5000कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे आयोजन श्रावस्ती बुद्ध विहार, बार्शी, मातोश्री रमाई महिला मंडळ, बार्शी तसेच बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकर समविचारी संघटना, बार्शी शहर व तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button