महाराष्ट्रसत्कारसोलापूर

विधान परिषद सदस्य आ. राजाभाऊ राऊत यांचा भाजपकडून जंगी सत्कार; जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

सोलापूर : सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषद सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आमदार राजाभाऊ राऊत यांचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला. प्रभाग क्रमांक ६ चे नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य गणेश दादा वानकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून राजाभाऊ राऊत यांचा सन्मान करण्यात आला.5000या सत्कार सोहळ्यास भाजप शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकर, जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, प्रांतिक सदस्य शहाजीभाऊ पवार, माजी आमदार रामभाऊ सातपुते, जिल्हा परिषद सदस्य चेतनसिंह केदार, महापालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.500यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, राजाभाऊ राऊत यांना राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्या अनुभवाच्या बळावर ते विधान परिषदेत सोलापूर जिल्ह्यातील पाणीटंचाई, शेती, रस्ते, रोजगार व विकासाशी संबंधित प्रश्न प्रभावीपणे मांडतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

नगरसेवक गणेश दादा वानकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, राजाभाऊ राऊत यांच्या निवडीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून जिल्ह्याच्या विकासाला नवी गती मिळेल. सत्काराला उत्तर देताना आ. राजाभाऊ राऊत यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. जनतेने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button