निवडणूकमहाराष्ट्रसोलापूर

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय; राजेंद्र राऊत 365 मतांच्या आघाडीने विजयी

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

सोलापूर : सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. मतमोजणीनंतर राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे उमेदवार वसंतराव देशमुख यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.500निवडणुकीत राजेंद्र राऊत यांना 483 मते मिळाली, तर वसंतराव देशमुख यांना 118 मते मिळाली. त्यामुळे राऊत यांनी 365 मतांच्या निर्णायक आघाडीने विजय संपादन केला. या निवडणुकीत 13 मते अवैध ठरली.

सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. भाजपने हा मतदारसंघ कायम राखत आपले संघटनात्मक बळ आणि जनाधार पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.509विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत फटाक्यांची आतषबाजी केली. पक्षाच्या नेत्यांनी राजेंद्र राऊत यांचे अभिनंदन करत हा विजय विकासकामांवरील विश्वासाचा कौल असल्याचे म्हटले.

निवडणूक निकाल

राजेंद्र राऊत (भाजप) – 483 मते

वसंतराव देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट) – 118 मते

आघाडी – 365 मते

अवैध मते – 135000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button