दिनबार्शीमहाराष्ट्र

सुयश विद्यालय, बार्शी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी, दि. २१ जून : सुयश विद्यालय, बार्शी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासासाठी योगाचे महत्त्व पटवून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.5000कार्यक्रमाच्या प्रारंभी योगाचे महत्त्व विषद करण्यात आले. त्यानंतर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. अलका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली योग दिन कार्यक्रमास सुरुवात झाली. क्रीडा शिक्षक अतुल जाधव सर, उपमुख्याध्यापक येवले सर यांनी विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारचे वॉर्म-अप व्यायाम करून घेतले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

यानंतर सौ. साखरे मॅडम यांनी विविध योगासने प्रत्यक्ष करून दाखवत ती योग्य पद्धतीने कशी करावीत, त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे फायदे, तसेच नियमित योगाभ्यासाचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने विविध आसनांचा सराव केला.5000योगामुळे शरीर निरोगी राहते, मन प्रसन्न व एकाग्र बनते तसेच दैनंदिन जीवनातील ताणतणाव कमी होण्यास मदत होते, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. विद्यार्थ्यांनी योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याचा संकल्पही केला.

या प्रसंगी विद्यालयातील सर्व सहशिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. “योग करा, स्वस्थ रहा, आनंदी रहा” हा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button