दिनबार्शीमहाराष्ट्र

नव महाराष्ट्र शिक्षण संकुलात योग दिनी योगासन व राजयोगाचा संगम

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

बार्शी, दि. २० जून : नव महाराष्ट्र विद्या विकास मंडळ संचालित कुंकूलोळ हायस्कूल व प्राथमिक विद्यामंदिर, बार्शी येथे शनिवारी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात योगगुरू अनिल वेदपाठक व अक्षय वेदपाठक यांनी प्रात्यक्षिकांसह विद्यार्थ्यांना विविध योगासने व प्राणायामाचे मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांकडून मानेचे, पायांचे व हातांचे सूक्ष्म व्यायाम करून घेतले. तसेच ताडासन, वृक्षासन यांसारखी योगासने आणि अनुलोम-विलोम, भ्रामरी यांसारखे प्राणायामही करून घेतले.500
यावेळी योगगुरू अनिल वेदपाठक यांनी योगाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, “योगामुळे शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक मनोबल, मनोधैर्य आणि मनःशांती प्राप्त होते. योगाच्या माध्यमातून विश्वशांतीचे ध्येयही साध्य होऊ शकते.” त्यानंतर प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या सृष्टीदीदी यांनी विद्यार्थ्यांकडून निर्देशित ध्यान (गाईडेड मेडिटेशन) करून घेतले. “मी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणार”, “मी शांत, शक्तिशाली आणि आत्मविश्वासू आहे” अशा सकारात्मक व प्रेरणादायी विचारांची रुजवण विद्यार्थ्यांच्या मनात करण्यात आली.
500
सृष्टीदीदी यांनी सांगितले की, अशा प्रकारचे निर्देशित ध्यान सकाळी व संध्याकाळी नियमितपणे केल्यास मानसिक एकाग्रता, स्मरणशक्ती आणि बौद्धिक क्षमता वाढण्यास मदत होते. पाच मिनिटांच्या या ध्यान सत्रादरम्यान सुमारे एक हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळेच्या मैदानावर अत्यंत शांत व एकाग्र वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमास संस्थेचे खजिनदार मोहनभाई बुचडे, प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका योगिता बेळे तसेच माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक दीपक उंबरदंड यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक सतीश होनमुटे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष खुडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन आनंद पाटील यांनी केले.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button