नागपूरप्रशासनमहाराष्ट्रशैक्षणिक

नीट परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतला आढावा

जिल्ह्यातील १२ हजार ५१२ विद्यार्थी देणार नीटची परीक्षा

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

नागपूर : जिल्ह्यातील १२ हजार ५१२ विद्यार्थी येत्या २१ जून रोजी होणाऱ्या नीट परीक्षेसाठी तत्पर झाले असून या परीक्षा सुरळीत पार पडाव्यात व विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी विविध उपाययोजनांचा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आढावा घेतला. नियोजन भवन येथे झालेल्या बैठकीस या परीक्षेचे शहर समन्वयक प्राचार्य अरविंदसिह ठाकुर, प्राचार्य फिरोजखान, सीआरपीएफ आणि सीआयएसएफचे वरिष्ठ अधिकारी, केंद्र प्रमुख उपस्थित होते.5000विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी हॉलमध्ये पुरेसा प्रकाश, योग्य बैठक व्यवस्था, जनरेटरची व्यवस्था, पिण्याचे पाणी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व केंद्र प्रमुख व परीक्षा केंद्र ज्या संस्थांना दिले आहेत त्या संस्थांनी योग्यती काळजी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.5000कोणताही अनुचित प्रकार या परीक्षेसाठी होऊ नये या दृष्टीने १४ परीक्षा केंद्र हे सीआरपीएफ व पोलीस व १६ केंद्र हे सीआयएसएफ व पोलीस यांच्या सुरक्षितेखाली ठेवण्यात आली आहेत.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button