“विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी वैराग पोलिसांचे हेल्पलाईन अभियान; संकटात एक फोन, मदतीसाठी पोलीस तत्पर!”

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी वैराग पोलिसांची पुढाकार; अडचणीत त्वरित मदतीचे आवाहन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत वैराग पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण यांनी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष मदत उपक्रम सुरू केला आहे. कोणत्याही प्रकारच्या संकट, छेडछाड, धमकी, अपघात किंवा इतर अडचणीच्या प्रसंगी विद्यार्थ्यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना थेट संपर्कासाठी पोलिस कर्मचारी व महिला पोलिस कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पोलीस हवालदार फुलचंद जाधवर (मो. 9834999369) तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल राणी एकंबे (मो. 7066739938) यांच्याशी विद्यार्थी संपर्क साधू शकतात.
तसेच वैराग पोलीस ठाण्याचा दूरध्वनी क्रमांक 02184-230433 व 9112226327, निर्भया पथक बार्शी उपविभाग 9112226350, महिला हेल्पलाईन 1091, चाईल्ड हेल्पलाईन 1098, आपत्कालीन सेवा 112 तसेच सोलापूर ग्रामीण कंट्रोल रूम 0217-2732000 हे क्रमांकही मदतीसाठी उपलब्ध आहेत.
विद्यार्थ्यांनी कोणतीही समस्या लपवून न ठेवता पोलिसांशी संपर्क साधावा. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर असून या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.




