कोल्हापूरमहाराष्ट्र

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पोलीस दलाच्या वाहनांचे लोकार्पण

डीपीडीसीतून दोन कोटी ऐंशी लाख रुपयांची वाहन खरेदी

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

कोल्हापूर : जिल्हा पोलीस दलास जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून आज राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते नवीन २६ वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी खासदार छत्रपती शाहू महाराज, आमदार सतेज पाटील, आमदार डॉ.अशोक माने, जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमीन, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक (गडहिंग्लज विभाग) अण्णासाहेब जाधव, शहर पोलिस उप अधीक्षक प्रिया पाटील, गृह उप अधीक्षक तानाजी सावंत, एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण आदी उपस्थित होते. 5000
सन २०२५-२६ या वर्षामध्ये कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचे बळकटीकणाच्या दृष्टीने जिल्हा नियोजनमधुन २९ वाहने खरेदीसाठी सुमारे दोन कोटी ऐंशी लाख रुपयांची तरतूद केली. या निधीतुन २ स्कॉर्पिओ एन, ७ स्कॉर्पिओ क्लासिक, ११ निओ बोलेरो प्लस, १ इनोव्हा क्रिस्टा, १ वज्र व ७ मोटारसायकल आदी वाहने खरेदी करण्यात आली.

सन २०२४ -२५ पालकमंत्री आबिटकर यांच्या सहकार्याने दोन कोटी ऐंशी लाख रुपये इतका निधी देण्यात आला होता, या निधीतुन यापूर्वी २६ चारचाकी वाहनांचे कोल्हापूर पोलीस दलास हस्तांतरण करण्यात आले होते. सध्या कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाकडे सुमारे ४५५ वाहने कार्यरत आहेत. यामध्ये २१३ दुचाकी तर २४२ चारचाकी वाहने सक्षमपणाने कार्यरत आहेत. या नूतन वाहनांचे हस्तांतरण झाल्याने पोलीस दलामध्ये अधिक कार्यक्षमता वाढेल तसेच गुन्हेगारीला अटकाव होण्यास मदत होईल असा आशावाद व्यक्त करून भविष्यातही पोलीस विभागाला आवश्यक तो निधी दिला जाईल असेही पालकमंत्र्यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. याप्रसंगी पोलीस दलातील इतर अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button