कोल्हापूरप्रशासनमहाराष्ट्र

एफडीएची कोल्हापूर-पुण्यात धडक कारवाई; २४.८१ लाखांचा औषधसाठा जप्त

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

कोल्हापूर : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात ८ जून २०२६ रोजी केलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण २४ लाख ८१ हजार रुपये किमतीचा औषधसाठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे औषध उत्पादन, साठवण आणि विक्री क्षेत्रातील अनियमिततेविरुद्ध प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोल्हापूर शहरातील रविवार पेठ परिसरातील मे. मेडटॅब्स फार्मा प्रा. लि. येथे एफडीएच्या पथकाने छापा टाकला. तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणात अॅलोपॅथिक औषधे, विशेषतः प्रतिजैविक (अँटिबायोटिक) इंजेक्शन्सचा साठा आढळून आला. संबंधित औषधसाठा जप्त करून पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे.5000दरम्यान, पुणे जिल्ह्यातील वडकी येथील मे. सिप्ला फार्मा अॅण्ड लाइफ सायन्सेस लिमिटेड यांच्या गोदामाची तपासणी करण्यात आली. यावेळी ‘रेक्टीन प्लस टॅब्लेट’ या शेड्यूल-एच अंतर्गत येणाऱ्या प्रिस्क्रिप्शन औषधाच्या पॅकेजिंगवर औषधाच्या वापराबाबत जाहिरात केल्याचे आढळून आले. हे औषध नियमांचे उल्लंघन असल्याने संबंधितांवर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी औषध उत्पादक, वितरक व विक्रेत्यांना सर्व कायदे व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. राज्यात औषध उत्पादन, साठवण, वितरण आणि विक्री क्षेत्रातील कोणत्याही बेकायदेशीर कृत्यांविरोधात कठोर व सातत्यपूर्ण कायदेशीर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

तसेच नागरिकांनी औषधे केवळ अधिकृत व परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावीत. संशयास्पद औषध विक्री, बेकायदेशीर साठा अथवा इतर अनियमिततेची माहिती तात्काळ प्रशासनाला कळवावी, असे आवाहनही एफडीएकडून करण्यात आले आहे.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button