चंद्रपूरप्रशासनमहाराष्ट्र

आक्षेपार्ह जाहिरातींच्या औषधांवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई ; 45 हजार 970 रुपयांचा साठा जप्त

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

चंद्रपूर : औषधे व जादूटोणादी उपाय (आक्षेपार्ह जाहिरात) कायदा, 1954 चे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने चंद्रपूर येथील एका आयुर्वेदिक औषध विक्री केंद्रावर कारवाई करून 45 हजार 970 रुपये किमतीचा औषधसाठा जप्त केला.

जटपुरा गेट परिसरातील पतंजली मेगा स्टोअरची तपासणी केली असता मधुमेह, लठ्ठपणा, हृदयरोग, दमा, ताप व वजन कमी करण्याबाबत आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणारे दावे असलेली 16 आयुर्वेदिक औषधे आढळून आली. यापैकी तीन औषधांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून उर्वरित साठा जप्त करण्यात आला.5000संबंधित औषधांवर कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय गंभीर आजार बरे करण्याचे दावे करण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली. अशा प्रकारच्या जाहिराती व औषध विक्री हा कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नागरिकांनी दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना बळी पडू नये तसेच वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही औषधांचे सेवन करू नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादक व विक्रेत्यांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button