बार्शी पोलीसांनी अवघ्या सहा तासात पकडले चोर!

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

परराज्यातील महिला टोळीस जेरबंद करून त्यांचेकडून 2,05,000/-रू.चा मुद्देमाल हस्तगत

बार्शी : दि. 07/09/2022 रोजी फिर्यादी नामे प्रियंका अंकुश थाटे वय २७ वर्षे रा. ईडा अंतगांव ता. भुम, , जि. उस्मानाबाद या बार्शी येथून मिरज येथे जाणे करीता औरंगाबाद इचलकरंजी बस मध्ये चढत असताना अज्ञात इसमाने त्यांचे जवळ असलेले सोन्याचे दागिणे व रोख रक्कम असा एकुण 2,05,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याबाबत बार्शी शहर पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने ती बार्शी शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ५९७/२०२२ भादवि. कलम ३७९ प्रमाणे दाखल आहे.सदर गुन्हयाचा तपास करीत असताना यातील फिर्यादीचे सोने व पैसे हे तीन महिलानी चोरल्याचे निष्पन्न झाले त्या नंतर त्यांचा तांत्रिक पध्दतीने तपास केला असता सदरच्या महिला ह्या बार्शी सोलापूर बसने सोलापूर कडे गेल्याचे निष्पन्न झाल्याने लागलीच त्यांचा पाठलाग करून त्यांना नान्नज ता. उत्तर सोलापूर येथून ताब्यात घेवून त्यांची महिला पोलीस अंमलदार करवी अंग झडती घेतली असता महिला पद्मीनी अनंत सकट वय-५० वर्षे, रहाणार धक्का तांडा शहाबाद ता.चितापूर जि. गुलबर्गा (कर्नाटक) हिचे अंगझडतीमध्ये १,८०,०००/- रू चे चार तोळयाचे सोन्याचे पट्टीचे गंठण व २२,५००/-रु. चे पाच ग्रॉम वजनाचे कानातील सोन्याचे दागिणे तसेच महिला नुरी रंजित उपाडे वय – ४० वर्षे रा. सदर, हिची अंग झडतीमध्ये चोरीस गेलेली रोख रक्कम २,५००/-रु. असे एकुण 2,05,000/- रू. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.पद्मीनी अनंत सकट, नुरी रंजित उपाडे, नर्मदाबाई नेरू उपादे उर्फ माधुरी जॅकी पाटील वय-३५ वर्षे, रा.धक्का तांडा शहाबाद ता.चितापूर जि.गुलबर्गा राज्य कर्नाटक यांना सदर गुन्हयात अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक 10 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.सदरची कामगीरी ही पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक सोलापूर हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी विभाग जालिंदर नालकुल, पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार, सहाय्यक पोलिस फौजदार अजित वरपे, पोलीस अरूण माळी, सिंधु देशमुख, वैभव ठेंगल, मनिष पवार, संगाप्पा मुळे, रवी लगदिवे, सचिन देशमुख, ज्ञानेश्वर घोंगडे, अर्जुन गोसावी, अविनाश पवार यांनी केली आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे बार्शी शहरामध्ये कौतुक केले जात आहे.

माऊली मोबाईल & इलेक्ट्रानिक वैराग

👉9763637152

👉 येथे मोबाईल, फ्रिज, वॉशिंग मिशन,LED टीव्ही, oneplus मोबाईल, सर्व हप्त्यावर मिळेल

👉 वस्तू बरोबर विश्वास पण मिळणार

👉 घेऊन या आधार मग मिळेल उधार

👉 आपल्याला विश्वासाला जपणारे दुकान (माऊली मोबाईल )

👉 आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, पॅन कार्ड, ATM, बँक पासबुक,

माऊली मोबाईल & इलेक्ट्रानिक वैराग

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या